उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- कामाच्या ठिकाणी विविध साहित्ये वापरली जातात. मात्र वापरलेल्या साहित्यांची शासकीय कामांमध्ये प्रयोगशाळेतून चाचणीच केली जात नसल्याचे दिसून येते.आज शासकीय कामे भरपूर प्रमाणात केली जात आहेत.जसे,इमारत बांधकाम,रस्ते बांधकाम,नाली बांधकाम,पाणी साठवणुकीसाठी बंधारे बांधकाम,सिमेंट-काँक्रीट बांधकाम व इतर अशा अनेक प्रकारची बांधकामे शासकीय स्तरावर केली जातात.शासकीय स्तरावर कामे तर केली जातात परंतु या कामांची जसे,सिमेंट,डांबर व इतर साहित्यांची प्रयोगशाळेतून चाचणी वा तपासणीच केल्या जात नसल्याची बाब समोर आली असल्याने,केलेल्या शासकीय बांधकामांवर भ्रष्टाचार होत असल्याचे निदर्शनास येत आहे.
खरं-तर काम सुरू करण्यापूर्वी सिमेंट,डांबर व इतर साहित्याची प्रयोगशाळेतून चाचणी करून घेणे आवश्यक असते.खरोखरच सिमेंट,डांबर व इतर साहित्ये योग्य प्रतीचे आहे किंवा नाही.यामध्ये काय-काय वापरले गेले आहे तसेच बांधकाम टिकाऊ होणार किंवा नाही तसेच बांधकाम निकृष्ट दर्जाचे होऊ नये यासाठी चाचणी अहवाल महत्वाचा ठरतो.मात्र शासकीय कामात असे चालत नाही.’चलती का नाम गाडी’असे केल्या जाते.त्यामुळेच बांधकामे एक वर्षही होत नाही तर फुटके-तुटके स्वरूपाचे होऊन भंगार स्वरूपाचे झालेले दिसते.तसे अधिकारी वा कर्मचारीही अंगाला हळद लावून घेत नसतात.त्यामुळे ठेकेदार वा कार्यान्वित यंत्रणाही याकडे दुर्लक्ष करून आपली पोळी साधण्याचा प्रयत्न करीत असतात.आज कित्तेक कामे शासकीय स्तरावर,शहरी व ग्रामस्तरावर केली जातात मात्र याकडे कुणी लक्ष घातले आहे कां?नाही तर अशा कामांवर साहित्य चाचणी अहवाल घेणे गरजेचे असून,या बाबत शासकीय स्तरावर दखल घेणे गरजेचे आहे.अन्यथा विकास कामे न होता झकास कामे झाल्याशिवाय राहणार नाही.