Thursday, May 28, 2026
Homeगडचिरोलीफिर्यादी मुलगाच निघाला मुख्य आरोपी; गुरवळा नदी परिसरातील जंगलात आढळला होता मृतदेह..

फिर्यादी मुलगाच निघाला मुख्य आरोपी; गुरवळा नदी परिसरातील जंगलात आढळला होता मृतदेह..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-गडचिरोली-गुरवळा मार्गावरील नदी परिसरातील जंगलात आज,गुरुवार २८ मे रोजी एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ माजली होती.मृतदेह आढळून आल्यानंतर स्थानिकांनी तात्काळ गडचिरोली पोलिसांना माहिती दिली.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.पाहणी दरम्यान तरुणाच्या डोक्यावर कुऱ्हाडीचे घाव दिसून आल्याने अज्ञाताने हत्या केल्याचे निष्पन्न झाले.त्यानुसार,पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि कहाणीमध्ये मोठा ट्विस्ट आला.विशेष म्हणजे,ज्याने हत्या केली,तोच ठाण्यात गेला आणि इतर तरुणांनी पैश्याच्या वादातून हत्या केल्याचा बनाव पोलिसांकडे केला.तक्रार देत असतांनाच पोलिसांना संशय आला आणि प्रकरणाचा भांडाफोड झाला.बादल नकटू कोसनकर वय १७ वर्षे,रा.डोंगरगाव, ता.गडचिरोली असे हत्या झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे,तर हत्या प्रकरणातील आरोपीही अल्पवयीन असून दोघेही चांगले मित्र होते.
दोन दिवसांपूर्वी मृतक बादल कोसनकर याने आरोपीच्या बहिणीबद्दल अपशब्द वापरले होते.यावरुन दोघांमध्ये भांडण झाले होते.याचाच राग मनात धरून आरोपीने बादलचा काटा काढण्याचा कट रचला.त्यासाठी त्याने काल,बुधवार २७ मेच्या दुपारी बादलला गांजा ओढण्यास बोलावून गुरवळा परिसरातील जंगलात नेले.काही वेळाने दोघेही घरी जाण्यास निघाले.मात्र,बादल पुढे जात असतांना आरोपीने मागून त्याच्यावर कुऱ्हाडीने जोरदार प्रहार केला.डोक्यावर वार केल्याने बादलचा घटनास्थळीच मृत्यू झाला.सुरुवातीला आरोपीने गुन्हा छपविण्यासाठी पोलीस ठाण्यात जाऊन खोटी माहिती दिली आणि अनोळखी तरुणांचा सहभाग असल्याचे सांगितले.परंतु,पोलिसांनी मोबाईल चॅटिंग,तांत्रिक तपास व अन्य बाबींच्या आधारावर अवघ्या काही तासांतच हत्या प्रकरणाचा उलगडा केला.या प्रकरणी गडचिरोली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) आणि ३(५)अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरची तपास कारवाई गडचिरोली पोलीस ठाण्याचे पीएसआय पूजा नैताम, पीएसआय प्रवीण बुंदे यांचेसह पथकाने केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता गडचिरोलीतच मिळू लागले उच्च दर्जाचे मोफत उपचार; दोन गुंतागुंतीच्या ‘ओव्हेरियन ट्युमर’ शस्त्रक्रिया यशस्वी..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात कॅन्सर (Malignancy)आणि इतर गंभीर आजारांच्या शस्त्रक्रिया स्थानिक पातळीवरच उपलब्ध करून देण्याच्या...

आता फेसबुक,इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲपच्या काही फीचर्स वापरासाठी मोजावे लागणार पैसे..

उद्रेक न्युज वृत्त :-आजच्या डिजिटल युगात फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲप हे अनेकांच्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग बनले आहेत.वैयक्तिक संवादापासून व्यवसाय,मार्केटिंग आणि मनोरंजनापर्यंत या प्लॅटफॉर्मचा...

शेतातील विहिरीत पडलेल्या वाघाच्या बछड्याला जीवदान..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या उमरेड तालुक्यातील लोहारा शिवारात पांढर तलाव परिसरातील एका शेतातील विहिरीत वाघाचा बछडा पडल्याची वार्ता पसरताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत...

दहा वर्षांपेक्षा जास्तकाळ कार्यरत असलेल्या इतर अनेक अभियंत्यांची यादी उपलब्ध असतांना केवळ मलाच लक्ष्य केले जाते.. – कोरचीतील नाडेकल पुलाशी संबंध नसल्याचा कार्यकारी अभियंता...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामात भ्रष्टाचार,अनियमितता तसेच नाडेकल पुलाच्या बांधकामासंदर्भात माध्यमातून प्रसिद्ध आरोप निराधार असल्याचा खुलासा सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक-२ चे कार्यकारी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!