Tuesday, July 14, 2026
Homeनागपूरप्रेयसीची हत्या करून फरार झालेला आरोपी अटकेत..

प्रेयसीची हत्या करून फरार झालेला आरोपी अटकेत..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-जिल्ह्याच्या कळमेश्वर-नागपूर महामार्गावरील फेटरी गावातील ओयो हॉटेलमध्ये गुरुवार २२ जानेवारी २०२६ रोजी एका तरुणीची चाकूने वार करून हत्या करण्यात आली होती.घटनेनंतर आरोपी प्रियकर फरार झाला होता. कळमेश्वर पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी चार पथके तयार केली होती.आरोपी सतत पोलिसांना हुलकावणी देत असतांनाच पोलिसांनी भोपाळ येथे तेलंगणा एक्सप्रेसमधून अटक केली आहे.रुचिका राजेश भांगे वय २१ वर्षे,रा.वेलकम सोसायटी,बोरगाव,नागपूर असे मृत तरुणीचे नाव आहे.तर सौरभ शिवदास जामगडे वय २६ वर्षे,रा.कळमेश्वर,जि.नागपूर असे आरोपीचे प्रियकराने नाव आहे.
रुचिका ही धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये शिकत होती.ती पोलिस भरतीची तयारी करीत असल्याने पोलिस लाईन टाकळी येथे सरावासाठी जात होती.सरावादरम्यान ती इतर तरुण मुलांसोबत व्यायाम करीत असे.यावरून
सौरभच्या मनात संशय निर्माण झाला होता.त्याने इतरांशी बोलण्यास मनाई केली होती,पण ती ऐकत नव्हती.अखेर सौरभ रुचिकाला फिरायला घेऊन जाण्याच्या बहाण्याने फेटरी येथील ओयो हॉटेलमध्ये घेऊन गेला.तिथे दोघांमध्ये वाद झाला.या  वादातून सौरभने रुचिताच्या गळ्यावर चाकूने वार केले.गंभीर जखमी झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.खुनानंतर आरोपीने हॉटेलच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारून घटनास्थळावरून पळ काढला होता.घटनेच्या दिवशी तो पुण्याकडे गेल्याची माहिती मिळाल्याने पथके पुणे व पिंपरी चिंचवड येथे रवाना करण्यात आली होती.त्यानंतर गुरुवार २९ जानेवारी रोजी तो मौदा तालुक्यातील महालगाव येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस महालगावकडे जात असतांनाच आरोपी नागपूरहून दिल्लीकडे जाणाऱ्या तेलंगणा एक्सप्रेसने निघाल्याची माहिती मिळाली.पोलिसांनी तात्काळ भोपाळ रेल्वे पोलिसांशी संपर्क साधून मदत मागितली. अखेर भोपाळ येथे तेलंगणा एक्सप्रेसमध्ये सौरभ जामगडे याला ताब्यात घेण्यात आले.नागपूरला आणल्यानंतर कळमेश्वर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास ४ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महत्त्वपूर्ण निर्णय..चंद्रपूर डाक विभागातून विभाजन होऊन आता गडचिरोली स्वतंत्र डाक विभाग..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत डाक विभागाने चंद्रपूर डाक विभागातून गडचिरोली डाक विभागाचे प्रशासकीय विभाजन करण्याची अधिकृत घोषणा केली आहे.या...

पदाचा दुरुपयोग; चार लाखाची झाडे विकली एक लाखात,सरपंच अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काहीजण एखाद्या पदावर विराजमान झाले की,स्वतःला मोठे पदाधिकारी समजून मनमर्जीने निर्णय घेण्याचा सपाटा चालवतांना दिसून येतात.पण,आपल्या मागची पार्श्वभूमी काय होती आणि...

आता भेसळयुक्त आणि दूषित अन्नाची एकाच तक्रारीवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण म्हणजेच एफएसएसएआयने भेसळयुक्त आणि दूषित अन्नावर कारवाई करण्यासाठी 'फूड सेफ्टी कनेक्ट' ॲप सुरू केले आहे.या...

वसतिगृहातील गंभीर अनियमिततेवर आमदार मसराम संतप्त.. – आरमोरी येथील वसतिगृहांची प्रत्यक्ष पाहणी..

उद्रेक न्युज वृत्त  आरमोरी(गडचिरोली):-आरमोरी शहरातील शासकीय आदिवासी मुला-मुलींच्या वसतिगृहास आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी अचानकपणे भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता वसतिगृहातील अनेक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!