- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-जिल्ह्याच्या गडचिरोली-चामोर्शी मार्गावरील शिवनीजवळ आज,शुक्रवार १८ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली.बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून प्रवासी बस रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली.धावत्या बसचे स्टिअरिंग लॉक झाल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.झालेल्या अपघातात ७ प्रवासी गंभीर जखमी,तर ३१ प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली.सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
अपघाताची माहिती प्राप्त होताच सामान्य रुग्णालय प्रशासनाने तातडीने वैद्यकीय यंत्रणा कार्यान्वित केली. सामान्य रुग्णालयातील रुग्णवाहिका सेवांनी तत्परता दाखवत अपघातग्रस्त प्रवाशांना विलंब न करता रुग्णालयात दाखल केले.रुग्णालयात दाखल झालेल्या प्रत्येक रुग्णाची तातडीने वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून,दुखापतीच्या स्वरूपानुसार आवश्यक उपचार व पुढील वैद्यकीय व्यवस्थापन करण्यात आले.
नवनियुक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रवि गावंडे यांनी अपघाताची माहिती मिळताच रुग्णालयातील आपत्कालीन वैद्यकीय सेवा तातडीने सज्ज ठेवण्याचे निर्देश दिले.अतिदक्षता विभागासह आवश्यक उपचार विभागांमध्ये सर्व वैद्यकीय अधिकारी,अधिसेविका कार्यालयातील परिचर्या संवर्ग,कक्षसेवक तसेच इतर आवश्यक कर्मचारी यांना तात्काळ उपस्थित राहून जखमी प्रवाशांना आवश्यक वैद्यकीय सेवा देण्याच्या सूचना देण्यात आल्या.अपघातातील रुग्णांची संख्या लक्षात घेता रुग्णालयातील उपलब्ध मनुष्यबळाचा योग्य पद्धतीने वापर करून रुग्णांची तपासणी,उपचार, निरीक्षण व आवश्यकतेनुसार पुढील उपचाराची व्यवस्था करण्यात आली.जखमी प्रवाशांना आवश्यक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित सर्व विभागांमध्ये समन्वय ठेवण्यात आला.दरम्यान, गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी सामान्य रुग्णालयात दाखल झालेल्या जखमी प्रवाशांची भेट घेतली.त्यांनी रुग्णांची प्रत्यक्ष विचारपूस करून त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली तसेच स्वतः रुग्णांची तपासणी करून उपचार व्यवस्थेची पाहणी केली.
- सर्व रुग्णांवर आवश्यक उपचार सुरू👇
अपघातातील दाखल ३८ प्रवाशांमध्ये ७ जखमी प्रवाशांवर आवश्यक वैद्यकीय उपचार करण्यात आले असून ३१ प्रवाशांना किरकोळ दुखापत झाल्याने त्यांच्यावर आवश्यक उपचार व वैद्यकीय निरीक्षण करण्यात आले.अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.सामान्य रुग्णालय प्रशासनाकडून सर्व दाखल रुग्णांना आवश्यक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आली असून,रुग्णांच्या प्रकृतीवर वैद्यकीय पथकाकडून लक्ष ठेवण्यात येत आहे. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी रुग्णालयातील संबंधित विभाग व कर्मचारी यांच्यामध्ये आवश्यक समन्वय कायम ठेवण्यात आला आहे.
- Advertisement -

