Wednesday, September 16, 2026
Homeगडचिरोलीप्रत्येक दुर्दैवी मृत्यूनंतर थेट डॉक्टरांना दोषी ठरवण्याऐवजी आजाराचे गांभीर्य समजून घेणे अत्यंत...

प्रत्येक दुर्दैवी मृत्यूनंतर थेट डॉक्टरांना दोषी ठरवण्याऐवजी आजाराचे गांभीर्य समजून घेणे अत्यंत आवश्यक- जिल्हा शल्य चिकित्सक -डॉक्टरांकडून नवजात बालकाचा जीव वाचवण्यासाठी शर्थीचे वैद्यकीय प्रयत्न..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्हा महिला व बाल रुग्णालय गडचिरोली येथे दाखल झालेल्या एका क्षयरोगग्रस्त जोखमीच्या गरोदर मातेची तातडीने यशस्वी शस्त्रक्रिया करून मातेचा जीव वाचवण्यात आला असून,जन्मतःच अत्यंत गंभीर स्थितीत असलेल्या नवजात बालकावरही विशेष बालरोगतज्ज्ञ चमूकडून अखंड २४ तास अतिदक्षता विभागात शर्थीचे उपचार करण्यात आले. शिवनी(ता.जि.गडचिरोली)येथील २२ वर्षीय गरोदर माता प्रिती काळबांधे यांना फुफ्फुसाचा क्षयरोग असल्यामुळे अधिकच्या उपचारासाठी १३ सप्टेंबर रोजी महिला व बाल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत(NTEP)त्या आधीपासून उपचाराखाली होत्या व त्यांच्या प्रकृतीत सुधारणा दिसून येत होती.रुग्णालयात दाखल झाल्यानंतर स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.मोनाली यांनी त्यांची कसून तपासणी केली.
  • तातडीने सिझेरियन शस्त्रक्रिया आणि सजग वैद्यकीय निर्णय👇
रात्री तपासणीदरम्यान बाळाच्या हृदयाच्या ठोक्यांमध्ये अनपेक्षित चढ-उतार(Fetal Tachycardia पाठोपाठ Bradycardia)झाल्याचे निदर्शनास आले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कर्तव्यावरील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.मानसी यांनी क्षणाचाही विलंब न लावता तातडीने सिझेरियन शस्त्रक्रिया(LSCS) करण्याचा निर्णय घेतला. शस्त्रक्रियागृहात आधीच SNCU चे वैद्यकीय अधिकारी डॉ.रजनिकांत उपस्थित होते.१४ सप्टेंबर रोजी पहाटे १:०६ वाजता २.६ किलो वजनाचे बाळ जन्माला आले.
  • जन्मतःच तत्काळ ‘नियोनेटनल रिसुसिटेशन’ आणि अतिदक्षता उपचार👇
बाळाने गर्भाशयातच मैला(Thick Meconium) गिळल्याने ते जन्मतः रडले नाही व त्याचा श्वास अडकला होता.अशा गुंतागुंतीच्या स्थितीत उपस्थित वैद्यकीय पथकाने एका क्षणाचाही अपव्यय न करता तत्काळ कृत्रिम श्वासोच्छवास(Neonatal Resuscitation) देऊन बाळाला वाचवण्याचे तातडीचे प्रयत्न सुरू केले. त्यानंतर बाळाला तातडीने विशेष नवजात काळजी कक्षात(SNCU)हलवून ‘सी-पॅप’ (CPAP) कृत्रिम श्वसन यंत्रणेवर ठेवण्यात आले.
  • वरिष्ठ तज्ज्ञ डॉक्टरांकडून २४ तास अविरत उपचार👇
बाळाची फुफ्फुसाची स्थिती गंभीर असल्याने(X-Ray मध्ये फुफ्फुसात दोष आढळल्यामुळे)वरिष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ.पेंदाम,डॉ.आशिष,डॉ.मृणाली,डॉ.केतन,डॉ.करपते, डॉ.निखील तसेच SNCU वैद्यकीय अधिकारी डॉ.नितीन मसराम व डॉ.विकेश या तज्ज्ञ चमूने बाळाला व्हेंटिलेटरवर(Ventilator)घेऊन शंभर टक्के ऑक्सिजन प्रणालीसह सर्व जीवनरक्षक औषधोपचार पुरवले.
उपचाराच्या प्रत्येक टप्प्यावर डॉक्टरांनी बाळाच्या वडिलांशी आणि नातेवाईकांशी सातत्याने संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची व संभाव्य धोक्यांची पूर्ण जाणीव (Counseling)करून दिली होती.वैद्यकीय पथकाने सलग ३० तासांहून अधिक काळ शर्थीचे प्रयत्न केले; मात्र गर्भाशयातील मैला फुफ्फुसात खोलवर गेल्यामुळे(Meconium Aspiration Syndrome) १५ सप्टेंबर रोजी दुपारी १२:१५ वाजता बाळाची प्राणज्योत मालवली.
  •  मातेची प्रकृती स्थिर👇
रुग्णालयातील डॉक्टरांच्या तत्परतेमुळे आणि योग्य वेळी घेतलेल्या शस्त्रक्रियेच्या निर्णयामुळे गुंतागुंतीच्या आजाराने ग्रस्त असलेल्या मातेचा जीव वाचवण्यात वैद्यकीय पथकाला यश आले असून मातेची प्रकृती सध्या स्थिर आहे.दुर्गम भागातील नागरिकांना सर्वोत्तम व २४ तास तत्पर सेवा देण्यासाठी जिल्हा महिला व बाल रुग्णालय प्रशासन सदैव कटिबद्ध असल्याचे डॉ माधुरी किलनाके वैद्यकीय अधीक्षक महिला व बाल रुग्णालय गडचिरोली यांनी सांगितले.
“वैद्यकीय विज्ञानाने कितीही प्रगती केली असली,तरी प्रत्येक रुग्णाचा मृत्यू हा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच होतो असे मानणे पूर्णपणे चुकीचे आणि अन्यायकारक आहे.वैद्यकशास्त्रात अनेक आजार आणि गुंतागुंती अशा असतात,ज्या मानवी नियंत्रणाच्या पलीकडच्या असतात; अशा अपरिहार्य (Inevitable)परिस्थितीत तज्ज्ञ डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही रुग्णाचा जीव वाचवणे निसर्गतः अशक्य ठरते.गर्भाशयात मैला जाणे (Meconium Aspiration),अचानक हृदयक्रिया बंद पडणे,अंतर्गत रक्तस्त्राव किंवा फुफ्फुसाचे गंभीर आजार यांसारख्या आकस्मिक वैद्यकीय आणीबाणीत डॉक्टर उपलब्ध सर्व साधनसामग्री व ज्ञानाचा वापर करून केवळ जीवन वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू शकतात. डॉक्टर हे जीवनरक्षक म्हणून कर्तव्य पार पाडतात, परंतु ते जीवन-मरणाचे अंतिम नियंता नसतात. त्यामुळे प्रत्येक दुर्दैवी मृत्यूनंतर थेट डॉक्टरांना दोषी ठरवण्याऐवजी,आजाराचे गांभीर्य आणि परिस्थितीची अपरिहार्यता समाजाने समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे,” असे मत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.वर्षा लहाडे यांनी व्यक्त केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सात गावांतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासासाठी नियमित बससेवा उपलब्ध करून देण्याची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा तालुक्यातील  आंधळी,नवरगाव,वाघेडा,बेलगाव,खैरी,मालदुगी आणि घाटी या सात गावांतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासासाठी सकाळी व सायंकाळी नियमित बससेवा उपलब्ध करून द्यावी,अशी ठाम मागणी ग्राम...

चुडाराम बल्हारपुरे यांच्या ‘गोंडवानाचा महायोध्दा: क्रांतिवीर बाबूराव शेडमाके’ नाटकातील नाट्यांश विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विदर्भातील प्रसिध्द नाटककार तथा महाराष्ट्र शासन पुरस्कृत साहित्यिक चुडाराम बल्हारपुरे यांच्या मधुश्री प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केलेल्या व संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या...

सिंदेवाहीत अभियंता दिन उत्साहात साजरा.. – गडबोरीच्या विद्यार्थ्यांना नवोदय मार्गदर्शिका व शैक्षणिक साहित्याचे वाटप..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त १५ सप्टेंबर रोजी अभियंता दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यानिमित्त गडबोरी येथील...

‘श्री गणेशा आरोग्याचा अभियान-२०२६’ अंतर्गत गणेश मंडळांमध्ये मोफत आरोग्य शिबिरे.. – ‘लोकसंवाद-२०२६’मधून विविध शासकीय योजनांची माहिती; ‘वीर योजना’बाबतही जनजागृती..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवाचे औचित्य साधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यभरात १४ ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत ‘लोकसंवाद-२०२६’ आणि ‘श्री गणेशा आरोग्याचा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!