उद्रेक न्युज वृत्त
संपादक/सत्यवान रामटेके
गडचिरोली :- जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी घेतलेला अवैध धंदे बंद बाबतीतील निर्णय अत्यंत वाखाणण्याजोगे होता.सदर निर्णयाने जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले होते.गडचिरोली जिल्ह्यात यापूर्वी कधीही न घडणारे चित्र सर्वत्र पहावयास मिळाले होते.अवैध धंदे करणाऱ्या अनेकांना हाय अलर्ट करून घाम फोडल्या गेले होते.त्यामुळेच जिल्ह्याच्या पोलिस विभागाचे प्रमुख असलेल्या पोलीस अधीक्षक यांचे पत्ररुपी वा शब्दरुपी आभार माननारे कार्यकर्ते एका रांगेत उभे होते; मात्र अशातच जिल्ह्याच्या तालुक्यातील चित्र हल्ली बदलत असल्याचे दिसून येत आहे.काहीजण ‘आपलाच करताहेत बोभाटा तर अवैध धंद्यांचा पुन्हा सुरू झालाय सपाटा’ असे दिसून येत आहे.यामुळे पोलीस अधीक्षक साहेबांचे आभार मानावे तर कसे?असा प्रश्न पत्ररुपी वा शब्दरुपी आभार माननाऱ्या कार्यकर्त्यांना पडला आहे.
तालुक्यातील काहीजण ‘तो मी नव्हेच’ अशी भूमिका बजावतांना दिसून येत आहेत.अशांचा पुढाकार असल्याशिवाय पुढील पायरी चढणे वा उतरणे अशक्य आहे.बाहेर तालुक्यातील दुसऱ्या तालुक्यात उडी घेऊन अवैध धंदे करणाऱ्यांचे प्रमाण जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत.कुणाला कानकुन लागू नये; याकरिता तेरी ‘भी चूप मेरी भी चूप’ करून संपूर्ण ठिकाणी लुका-छुपीचा खेळ सुरू असल्याची खमंग चर्चा सर्वत्र सुरू आहे.काही जणांचे खिसे गरम होत नसले वा काही जण पैसे घेत नसले तरी वरिष्ठांकडे आपली बढाई करून अवैध धंदे करणाऱ्यांना दुजोरा देण्याचे हल्ली काम सुरू आहे. त्यामुळे अशांच्याही मुसक्या आवळणे गरजेचे आहे; असे सुजाण नागरिकांकडून वार्तालाप केले जात आहे.