Saturday, September 26, 2026
Homeगडचिरोलीपुरामुळे ५२५ नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर; आजारी विद्यार्थिनीला एसडीआरएफच्या मदतीने उपचारासाठी हलविले..

पुरामुळे ५२५ नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर; आजारी विद्यार्थिनीला एसडीआरएफच्या मदतीने उपचारासाठी हलविले..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-लगतच्या छत्तीसगडमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे भामरागड परिसरात निर्माण झालेल्या पूरस्थितीत जिल्हा प्रशासनाने ५२५ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले.ही कार्यवाही काल शुक्रवारच्या दुपारपासून रात्री उशिरापर्यंत सुरू होती.आता पाणी ओसरू लागल्याने परिस्थितीत सुधारणा होत आहे.
पूरस्थिती निर्माण होताच जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तहसीलदार किशोर बागडे यांच्या नेतृत्वात स्थानिक प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत स्थलांतराची कार्यवाही केली. बाधित भागातील परिस्थितीवर प्रशासन लक्ष ठेवून आहे.दरम्यान,बिनागोंडा आश्रमशाळेत शिकणाऱ्या एका आजारी मुलीला एसडीआरएफ पथकाच्या मदतीने गुंडेनूर नाला ओलांडून सुरक्षितपणे लाहेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.
पाणी ओसरत असले तरी नदीकाठच्या व सखल भागातील नागरिकांनी सतर्क राहावे,स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि पाणी वाहत असलेल्या मार्गांवरून प्रवास करू नये,असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धक्कादायक..! धावत्या ट्रेनवर दगडफेक; काचांचे तुकडे प्रवाशांच्या जेवणात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या दुरंतो एक्स्प्रेसवर दगडफेक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.दगडफेकीत ट्रेनच्या एसी कोचच्या खिडक्यांच्या काचा फुटून काचांचे तुकडे...

मुसळधार पावसाचा फटका..! भामरागड-आलापल्ली मार्गावरील वाहतूक बंद; ६३ गावांचा तुटला संपर्क..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या विविध भागात दमदार पावसाने हजेरी लावली आहे.अश्यातच जिल्ह्यातील पर्लकोटा नदीचे पाणी पुलावरून वाहत असल्याने भामरागड-आलापल्ली मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली...

जुनी वडसा येथे झुडपी जंगलातील वनपट्ट्यांबाबत सभापती सचिन खरकाटे यांचे मोलाचे मार्गदर्शन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषद हद्दीतील जुनी वडसा येथील झुडपी जंगल परिसरावर वर्षानुवर्षे वास्तव्यास असलेल्या आणि शेती कसत असलेल्या नागरिकांना वनजमिनीचे पट्टे मिळवून देण्यासाठी...

शिधापत्रिकाधारकांनी १५ दिवसांत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांना धान्याचा लाभ नियमितपणे मिळावा आणि शिधापत्रिकेवरील सदस्यांची माहिती अचूक व अद्ययावत राहावी,यासाठी गडचिरोली तालुक्यात ई-केवायसी प्रक्रिया...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!