Thursday, October 8, 2026
Homeगडचिरोलीपहिल्या प्रशिक्षणास अनुपस्थित १०८ कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार.. -निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी...

पहिल्या प्रशिक्षणास अनुपस्थित १०८ कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार.. -निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना बजावली नोटीस..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २० नोव्हेंबर २०२४ रोजी होणार असून अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या गडचिरोली विधानसभा मतदारसंघाच्या पहिल्या प्रशिक्षणास गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी टाकली आहे.गैरहजर राहिलेल्या १०८ कर्मचाऱ्यांना गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी राहुल कुमार मीना यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.गडचिरोली येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत २६ व २७ ऑक्टोंबर रोजी मतदान अधिकाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण पार पडले.
प्रशिक्षणासाठी गडचिरोली,धानोरा व चामोर्शी तालुक्यातील १ हजार ८१९ कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली.यामध्ये केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांचा समावेश आहे.परंतु वेगवेगळी कारणे दाखवून नियुक्ती रद्द करण्यासाठी काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे अर्ज केलेला आहे.प्रशिक्षणात अनधिकृतपणे १०८ कर्मचारी गैरहजर राहिले.गैरहजर कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून तात्काळ खुलासा मागविण्यात आला आहे.प्राप्त झालेला खुलासा उचित व समाधानकारक न वाटल्यास  पहिल्या प्रशिक्षणास अनधिकृत गैरहजर राहिलेल्या कर्मचाऱ्यांवर लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१ चे कलम १३४ अन्वये प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करण्यात येणार आहे; अशी माहिती गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी राहुल कुमार मीना यांनी दिली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

रब्बी हंगामासाठी प्रमाणित बियाणे व पीक प्रात्यक्षिकांना अनुदान; शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सन २०२६-२७ च्या रब्बी हंगामात पिकांची उत्पादकता वाढविणे आणि सुधारित व संकरित वाणांच्या प्रमाणित बियाण्यांचा वापर वाढविण्यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि...

सिने सृष्टीवर शोककळा; ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन.. – ज्येष्ठ अभिनेते आणि माझे निकटचे मित्र नाना पाटेकर यांची अशी अकाली आणि अचानक ‘एक्झिट’...

उद्रेक न्युज वृत्त :-ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे आज,गुरुवार ८ ऑक्टोंबर रोजी पहाटेच्या सुमारास वयाच्या ७५ व्या वर्षी गोव्यात निधन झाले.गोव्यातील डोना पौला येथील...

महाराष्ट्रातील गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत केंद्र सरकारकडून विशेष मदतीची मागणी; मुख्यमंत्र्यांनी घेतली अमित शाह यांची भेट..

उद्रेक न्युज वृत्त  नवी दिल्ली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यात आज,बुधवार ७ ऑक्टोंबरला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.या भेटीत...

नक्षलवाद्यांनी जमिनीत लपवून ठेवलेला शस्त्रसाठा व स्फोटक साहित्ये जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोलीच्या महाराष्ट्र व छत्तीसगडच्या नारायणपूर सीमेलगत असलेल्या भामरागड तालुक्यातील कोपर्शी जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी जमिनीत लपवून ठेवलेला शस्त्रसाठा व स्फोटक साहित्ये गडचिरोली पोलिसांनी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!