- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
पुणे :-जिल्ह्याच्या लोणावळ्यातील सर्वात लोकप्रिय ठिकाणांपैकी एक म्हणजे भुशी डॅम.! पावसाळ्यात तेथील धबधब्यासारखे वाहणारे पाणी पर्यटकांना मंत्रमुग्ध करून सोडतात.पाण्याच्या थंड प्रवाहात भिजण्याचा आनंद घेत पर्यटक गर्दी करीत असतात. अश्याच प्रकारे आज,रविवार ८ जून रोजी दहा मित्र डॅम परिसरात पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी गेले होते. यातील दोघेजण डॅमच्या(धरण) धबधब्याजवळील पाण्यात उतरले असता खोल पाण्याचा अंदाज न आल्याने दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज रविवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली. अश्रफअली शेख,रा.डांगे चौक,पिंपरी-चिंचवड,पुणे तर मोहम्मद जमाल शेख रा.तुलापुर,उत्तर प्रदेश अशी मृत तरुणांची नावे आहेत.
सध्या स्थितीत मुसळधार पावसाने धरणे,नदी,नाले फुगून भरली आहेत.त्यामुळे पर्यटन प्रेमी नैसर्गिक सानिध्याकडे वळलेली दिसून येतात.अश्याच प्रकारे आज रविवारी दहा मित्रांनी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी लोणावळ्यातील भुशी डॅमची निवड केली.त्यानुसार मौज मजा सुरू असतांनाच दहा जणांपैकी दोघांनी प्रशासनाने भुशी डॅम परिसरात लावलेल्या तारेचे कुंपण ओलांडून डॅमच्या पाठीमागील धबधब्याजवळ गेले.तिथून त्यांनी पाण्यात उतरण्याचा निर्णय घेतला,मात्र त्यांना खोल पाण्याचा अंदाज न आल्याने अश्रफअली आणि मो. जमाल यांचा बुडून मृत्यू झाला.मित्रांनी आरडाओरड केली. मात्र,तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.घटनेची माहिती मिळताच शिवदुर्ग रेस्क्यू टीम आणि लोणावळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले असता दोघांचे मृतदेह दुपारच्या सुमारास पाण्यातून बाहेर काढण्यात आले.
- Advertisement -

