उद्रेक न्युज वृत्त :-जम्मू-काश्मीरच्या पहलगामपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या प्रसिद्ध पर्यटन स्थळ बैसरन व्हॅली येथे आज,मंगळवारी २२ एप्रिलला दुपारी अडीच वाजेच्या सुमारास बैसरन मैदानावर बंदूकधारी सैनिकी गणवेशात येत पर्यटकांना त्यांची नावे आणि धर्म विचारत शिवीगाळ केली आणि घोडेस्वारीचा आनंद लुटणाऱ्या पर्यटकांवर अंधाधुंद गोळीबार केला.झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.अशातच मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.बैसरन व्हॅली हे पहलगामपासून काही किलोमीटर अंतरावर असलेले प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे.या ठिकाणी फक्त घोड्याने किंवा पायीच जाता येते.दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक आनंद लुटण्यासाठी भेट देत असतात.गोळीबाराची घटना अशा वेळी घडली, ज्यावेळी पर्यटक मोठ्या प्रमाणात होते.
पर्यटकांना नाव आणि धर्म विचारत दहशतवाद्यांचा अंधाधुंद गोळीबार; २० जणांचा मृत्यू झाल्याची भीती..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक


सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES