उद्रेक न्युज वृत्त
रत्नागिरी : राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीशे यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे.त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप होत आहे.विरोधी पक्षांनी ठाकरे गटाची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससह विरोधी पक्षांनी हे प्रकरण उचलून धरले आहे.या प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल शनिवारी एसआयटी चौकशीची घोषणा केली.आता वारीशे यांच्या कुटुंबाला सरकारने आज मदतीची मोठी घोषण केली आहे.
शशिकांत वारीशे यांच्या मृत्यू प्रकरणी संशयित आरोपी पंढरीनाथ आंबेरकर हा पोलीस कोठडीत आहे.या सगळ्या धक्कादायक जीवघेण्या प्रकरणात वारीशे यांचे कुटुंब कोलमडून पडले आहे.त्यांच्या कुटुंबाची व्यथा माध्यमांनी लावून धरत वास्तव जगासमोर आणले आणि कुटुंबाला मदत करण्याच्या मागणीने जोर धरला.अखेर आज या मागणीला यश आले आहे.राज्य सरकारने वारीशे यांच्या कुटुंबाला २५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.तर शिक्षण घेत असलेल्या वारीशे यांचा मुलगा यश यालाही कायमस्वरूपी नोकरी घेण्यात येईल; अशी ग्वाही पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीत पत्रकारांशी संवाद साधताना दिली आहे.