Monday, July 13, 2026
Homeनागपूरपत्रकाराने बिल्डरला मागितली पाच लाखाची खंडणी…अन् पडल्या बेड्या…!

पत्रकाराने बिल्डरला मागितली पाच लाखाची खंडणी…अन् पडल्या बेड्या…!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

 नागपूर :- शहरातील बिल्डरला पाच लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या पत्रकारासह तिघांना पोलिस उपायुक्त निकेतन कदम यांच्या विशेष पथकाने अटक केली.त्यांच्याकडून कार,मोटारसायकल व मोबाइल फोन जप्त केले आहेत.ही कारवाई कामठी कळमना मार्गावरील मरारटोली परिसरात काल,गुरुवारी दिनांक-६ जून रोजी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास करण्यात आली.

वीरकुमार दिनसिंह वय ३० वर्षे,रा.संताजीनगर, कन्हान,ता.पारशिवनी,शेख हबीब शेख रहमतुल्ला वय ३४ वर्षे,रा.पटेलनगर,कन्हान,ता.पारशिवनी व सय्यद रिजवान हैदर सय्यद अस्वर अली रिजवी वय ५० वर्षे, रा.सैलाबनगर,कामठी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.सचिन गोपाल गुप्ता वय ४५ वर्षे,रा.जीपीओ चौक,सिव्हिल लाइन,नागपूर हे केसर लँड बिल्डर्स नामक फर्मचे मालक आहेत. वीरकुमारसह अन्य दोघे न्यू आवाज न्यूज या यू-ट्यूब चॅनेलचे प्रतिनिधी आहेत.

सचिन गुप्ता यांनी कन्हान शहरातील पांदण रस्त्यावर ले-आउट टाकून भूखंड विकल्याचा आरोप करीत तिघांनी त्यांना १० लाख रुपयांची मागणी केली होती. त्यामुळे सचिन यांनी १७ मे रोजी तिघांच्या विरोधात कामठी (नवीन) ठाणे व पोलिस उपायुक्त निकेतन कदम यांच्याकडे तक्रार केली होती.पैसे मागणीचा तगादा वाढल्याने पोलिसांनी तीन दिवसांपासून सापळा रचला होता.तिघेही गुरुवारी दुपारी मरारटोली भागात आले.त्यांनी सचिन गुप्ता यांच्याकडून पाच लाख रुपये स्वीकारताच पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेत अटक केली.याप्रकरणी कामठी (नवीन) पोलिसांनी भादंवि ३८४,३८६,५०६,५०४,३४ अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

पोलिस अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार सचिन गुप्ता यांनी वीरकुमारला पाच लाख रुपये असलेली नोटांची पिशवी दिली.त्यात एक लाख रुपयांच्या नोटा असली तर चार लाख रुपयांच्या नोटा नकली होत्या. पोलिसांनी वीरकुमारची एमएच-४९/यू- ६८४५ क्रमांकाची होंडा सिटी कार,इतर दोन आरोपींची एमएच-४०/एवाय-३४६२ क्रमांकाची मोटारसायकल व तीन मोबाइल फोन जप्त केले.वीरकुमारने यापूर्वी अनेकांकडून खंडणी वसूल केली आहे.यात शासकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.त्याच्या विरोधात कन्हान पोलिस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद आहे, अशी माहिती तपास अधिकारी तथा पोलिस उपनिरीक्षक राहुल साबळे यांनी दिली.त्याच्याकडून ब्लॅकमेलिंगच्या इतर घटना उघड होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी मधील रिक्त जागांसाठी प्रवेश...

आता मार्केटमध्ये येणार दहा किलो वजनाचा गॅस सिलेंडर..

उद्रेक न्युज वृत्त:-बऱ्याच ठिकाणी जागेचा अभाव, वजनी सिलेंडर तसेच वजनानुसार वाढणारी रक्कम सर्वसामान्यांना न झेपावणारी असते.विशेषतः लहान व्यावसायिक,हॉटेल चालक आणि रस्त्यावरील विक्रेते. यासाठी सरकारी...

वाघ दिसताच पळत सुटले; जीव वाचवण्यासाठी धावत असतांनाच बंधाऱ्यात पडले,बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.शेतावर गेलेले तिघेजण वाघ दिसताच जिकडे बनेल तिकडे धावत-पळत सुटले.पण जीव वाचवण्यासाठी बंधाऱ्यावरून...

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!