Saturday, September 5, 2026
Homeगोंदियानिवडणूक विभागाने पकडली १ कोटी ७६ लाखांची रक्कम….

निवडणूक विभागाने पकडली १ कोटी ७६ लाखांची रक्कम….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

 गोंदिया :- आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध-व्यवसाय,पैसे आणि दारूची वाहतूक रोखण्यासाठी तैनात करण्यात आलेल्या पथकाने गोरेगाव तालुक्यातील सोनी येथील नाक्यावर एका कारमधून १ कोटी ७६ लाख रुपयांची रोख रक्कम काल, बुधवारी दिनांक – २७ मार्च रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास जप्त केली.लोकसभा निवडणुकीदरम्यान मतदारांना आमिष देण्यासाठी रोख रक्कमेचा वापर केला जातो.त्यामुळे प्रकाराला आळा घालण्यासाठी निवडणूक विभागाने जिल्ह्यात ठिकठिकाणी नाके उभारून भरारी पथकाची नेमणूक केली आहे.लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा काल,बुधवार शेवटचा दिवस होता. अजून प्रचाराला सुरुवात व्हायची असून त्यापूर्वीच निवडणुकीसाठी पैशाची वाहतूक सुरू झाली आहे.काल,बुधवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास गोंदिया-ठाणा ते गोरेगावकडे जाणाऱ्या कारची सोनी नाक्याजवळ निवडणूक विभागाचे एफएसटी व एसएसटी पथक प्रमुख बाबा शिंदे,सरिता लिल्हारे, विलास सूर्यवंशी, रंजना चानप, रामानंदा दास, श्यामकला भोयर,संदीप पटले यांनी तपासणी केली. दरम्यान कारमधून १ कोटी ७६ लाख रुपयांची रक्कम जप्त केली.यावेळी तहसीलदार किसन भदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामा करून मिळालेली रक्कम सील करण्यात आली.पंचनामा इएसएमएस ॲपवर भरून पुढील कारवाई केली.पोलिस निरीक्षक अजय भुसारी व पोलिस उपनिरीक्षक घोलप यांनी कायदेशीर कारवाई केली.या कारवाईसाठी तहसीलदार गोमासे व निवडणूक निर्णय अधिकारी पूजा गायकवाड यांनी मार्गदर्शन केले.लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात केलेली ही पहिलीच कारवाई आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गांजाची वाहतूक; तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त,दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ओडिशातून आणलेला तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त केला.कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले...

शिक्षक दिन व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.. -शिष्यवृत्ती परीक्षेत देसाईगंज नगर परिषद शाळेचे १४ विद्यार्थी पात्र..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी सोहळा आज,शनिवार ५ सप्टेंबर रोजी नगर परिषद देसाईगंजच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात...

बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल कसा होणार? – न्यायालयाने आरोपीवरील दाखल गुन्हे केले रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणला वा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल तरी कसा होणार? असे म्हणत...

शिक्षक दिन उत्साहात संपन्न; ‘ज्ञानमित्र’ उपक्रमातून विद्यार्थी बनले विद्यार्थ्यांचे शिक्षक..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंजच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड येथे आज,शनिवार ५ सप्टेंबरला शिक्षक दिन व स्वयंशासन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!