Thursday, June 4, 2026
Homeअमरावतीनाली बांधकामाचे बिल मंजूर झाल्याचा मोबदला म्हणून ७२ हजार रुपयांची लाच…-सार्वजनिक बांधकाम...

नाली बांधकामाचे बिल मंजूर झाल्याचा मोबदला म्हणून ७२ हजार रुपयांची लाच…-सार्वजनिक बांधकाम विभागातील उपविभागीय अधिकाऱ्यासह कनिष्ठ अभियंत्याला अटक…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

अमरावती :- नाली बांधकामाचे बिल मंजूर झाल्याचा मोबदला म्हणून ७२ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागातील उपविभागीय अधिकाऱ्यासह कनिष्ठ अभियंत्याला लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली.सदरची कारवाई काल,१ जुलै रोजी सायंकाळी  सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग कार्यालयाच्या आवारात करण्यात आली.

उपविभागीय अधिकारी सुनील विठ्ठलराव मेश्राम वय ५४ वर्षे व कनिष्ठ अभियंता वृषभ गजानन किटुकले वय २८ वर्षे अशी अटक करण्यात आलेल्या लाचखोरांची नावे आहेत.या प्रकरणातील तक्रारदार हे कंत्राटदार असून,त्यांनी सार्वजनिक बांधकाम (विशेष प्रकल्प) अमरावतीमार्फत नांदगाव खंडेश्वर येथे नाली बांधकाम केले होते.या बांधकामाचे बिल मंजूर झाल्याचा मोबदला म्हणून उपविभागीय अधिकारी सुनील मेश्राम व कनिष्ठ अभियंता वृषभ किटुकले या दोघांनी त्यांना १ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली.त्यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली.तक्रारीच्या पडताळणीत सुनील मेश्राम व वृषभ किटुकले यांनी तडजोडीअंती ७२ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानुसार सापळा रचण्यात आला.सुनील मेश्राम व वृषभ किटुकले यांनी तक्रारदार कंत्राटदाराकडून लाचेची ७२ हजार रुपयांची रक्कम स्वीकारताच दबा धरून बसलेल्या पथकाने त्यांना रंगेहाथ अटक केली. त्यांच्याविरुद्ध गाडगेनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.ही कारवाई एसीबीचे पोलिस अधीक्षक मारूती जगताप यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक केतन मांजरे,प्रवीणकुमार पाटील व चित्रा मेसरे यांच्यासह अंमलदार महेंद्र साखरे, वैभव जायले, उमेश बोपते, अभिजीत उमक यांनी केली.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जिल्हास्तरीय युवा पुरस्कार २०२५-२६ साठी प्रस्ताव स्वीकारण्यास मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय,पुणे यांच्या वतीने राज्याचे युवा धोरण २०१२ अन्वये जिल्हास्तरीय युवा पुरस्कार सन २०२५-२६ साठी पात्र...

डिझेलचा टँकर पलटी होताच इंधन नेण्यासाठी लोकांची झुंबड..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-आधीच इंधन कमतरतेमुळे पेट्रोल पंपावर गर्दी होतांना दिसून येते.अश्यातच एखाद्या घटनेत चक्क इंधनाचा टँकर पलटी होऊन डिझेलचा महापूर होत असल्याची बाब...

तूर प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवरील ‘शेतकरी योजना’ या उपक्रमांतर्गत कडधान्य आत्मनिर्भरता अभियान सन २०२६-२७ अंतर्गत तूर प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ घेण्यासाठी...

गोदाम बांधकाम,तेल काढणी युनिट,कडधान्य प्रक्रिया व पॅकेजिंग युनिटसाठी लाखो रुपयांपर्यंत अनुदान.. – बना स्वतःच मालक; ऑफलाईन अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील भुईमूग,करडई,तीळ यांसारख्या तेलबिया पिकांचे तसेच तूर,हरभरा व इतर कडधान्यांचे उत्पादन वाढविण्यासोबतच त्यांचे मूल्यवर्धन आणि शेतकऱ्यांना अधिक आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!