Monday, July 13, 2026
Homeनागपूरनागपुरात चिकनगुनियाचे सर्वाधिक रुग्ण.. - स्नायू,सांधेदुखीसोबतच चेहरा काळवंडणे,जांघेत,काखेत अल्सरने नागरिक हैराण..

नागपुरात चिकनगुनियाचे सर्वाधिक रुग्ण.. – स्नायू,सांधेदुखीसोबतच चेहरा काळवंडणे,जांघेत,काखेत अल्सरने नागरिक हैराण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-आरोग्य विभागाने राज्यभरातील चिकनगुनियाची आकडेवारी जाहीर केली.यात नागपूर शहरात सर्वाधिक रुग्ण असून,मुंबई शहर दुसऱ्या क्रमांकावर आहे,तर जिल्ह्यात कोल्हापूर प्रथम स्थानी, तर पुणे दुसऱ्या क्रमांकावर आहे.राज्यात १ जानेवारी ते ७ सप्टेंबरपर्यंत २ हजार ६४३ रुग्णांची नोंद झाली आहे.
एक डास माणसाची किती दाणादाण उडवतो आणि व्यवस्था कोलमडून टाकतो,याचा अनुभव चिकुनगुनियाच्या वाढत्या रुग्णसंख्येवरून दिसून येत आहे.या आजारात स्नायू व सांधेदुखीसोबतच चेहरा काळवंडणे,जांघेत,काखेत अल्सरमुळे रुग्ण हैराण
होत आहेत.आरोग्य विभागाने उपलब्ध करून दिलेल्या आकडेवारीनुसार राज्यात २०२३ मध्ये ग्रामीण भागात १ हजार ३८,तर शहरी भागात ६६४, असे एकूण १ हजार ७०२ रुग्णांची नोंद झाली होती.
यावर्षी ७ सप्टेंबरपर्यंत ग्रामीण भागात १ हजार १९१, तर शहरी भागात १ हजार ४५२,असे एकूण २ हजार ६४३ रुग्णांची नोंद झाली.मागील वर्षीच्या तुलनेत दुपटीने रुग्ण वाढले आहेत.
चिकनगुनिया संवेदनशील शहरात नागपूर अव्वल स्थानी आहे.७ सप्टेंबरपर्यंत ५७४ रुग्णांची नोंद झाली. त्याखालोखाल मुंबई शहरात २५६,कोल्हापूरमध्ये १५४,पुण्यात १५१,अकोल्यात ८८,सांगलीत ८४, अमरावतीत ४२,नाशिकमध्ये ४०,लातूरमध्ये २७,तर पिंपरी-चिंचवडमध्ये २२ रुग्ण आढळून आले आहेत.
२०२३ मध्ये शहराच्या तुलनेत ग्रामीणमध्ये चिकनगुनियाचे रुग्ण अधिक होते; परंतु २०२४ मध्ये ग्रामीणच्या तुलनेत शहरात रुग्णांची संख्या वाढताना दिसून येत आहे. या वर्षी कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक २०६, पुण्यात १६९, अमरावतीत १२३, अकोल्यात १०२, बीडमध्ये ८९,पालघरमध्ये ८२, गोंदियामध्ये ६८,सांगलीमध्ये ६६,नागपूरमध्ये ५७, तर वाशिममध्ये ५२ रुग्णांची नोंद झाली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी मधील रिक्त जागांसाठी प्रवेश...

आता मार्केटमध्ये येणार दहा किलो वजनाचा गॅस सिलेंडर..

उद्रेक न्युज वृत्त:-बऱ्याच ठिकाणी जागेचा अभाव, वजनी सिलेंडर तसेच वजनानुसार वाढणारी रक्कम सर्वसामान्यांना न झेपावणारी असते.विशेषतः लहान व्यावसायिक,हॉटेल चालक आणि रस्त्यावरील विक्रेते. यासाठी सरकारी...

वाघ दिसताच पळत सुटले; जीव वाचवण्यासाठी धावत असतांनाच बंधाऱ्यात पडले,बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.शेतावर गेलेले तिघेजण वाघ दिसताच जिकडे बनेल तिकडे धावत-पळत सुटले.पण जीव वाचवण्यासाठी बंधाऱ्यावरून...

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!