Thursday, September 3, 2026
Homeगडचिरोलीनगर परिषद निवडणुकांसाठी प्रशासन सज्ज; तीन परिषदांमध्ये ६८ जागांसाठी ९२ हजार...

नगर परिषद निवडणुकांसाठी प्रशासन सज्ज; तीन परिषदांमध्ये ६८ जागांसाठी ९२ हजार ८६४ मतदार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
​गडचिरोली :-जिल्ह्यातील गडचिरोली,देसाईगंज आणि आरमोरी या तीन  नगर परिषद अंतर्गत एकूण ६८ सदस्य जागांसाठी  निवडणूक होणार असून यात जिल्ह्याभरातून एकूण ९२ हजार ८६४ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत,यासाठी या नगरपरिषद क्षेत्रात १०५ मतदान केंद्रे सज्ज करण्यात आली असून निवडणुकीसाठी प्रशासकीय तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिली आहे.
  • नगर परिषद निहाय तपशील👇
​गडचिरोली नगर परिषद येथे सर्वाधिक ४३ हजार ५१३ मतदार असून,त्यांच्यासाठी ४६ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.या नगर परिषदेत एकूण २७ सदस्यांची निवड होणार आहे.
​देसाईगंज नगर परिषदेत एकूण २६ हजार ३५२ मतदार असून ३२ मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडेल.या ठिकाणी एकूण २१ सदस्यांची निवड केली जाईल.
​आरमोरी नगर परिषदेमध्ये २२ हजार ९९९ मतदार आहेत,जे २७ मतदान केंद्रांवर मतदान करतील. आरमोरीसाठी एकूण २० सदस्य संख्या निश्चित करण्यात आली आहे.
  • आरक्षण आणि महिला प्रतिनिधीत्व👇
​या निवडणुकीत महिला प्रतिनिधीत्वावर विशेष भर देण्यात आला आहे.तिन्ही नगर परिषदांमध्ये निवडून द्यावयाच्या एकूण ६८ सदस्यांपैकी तब्बल ३५ जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
​प्रवर्गनिहाय राखीव जागांची माहिती: एकूण ६८ जागांपैकी ३१ जागा सर्वसाधारण,१८ जागा नामाप्र (नामांकित मागास प्रवर्ग)साठी,११ जागा अनुसूचित जाती आणि ८ जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत.
​महिला आरक्षणाचा तपशील: गडचिरोली नगर परिषदेतील २७ पैकी १४ जागा,देसाईगंज नगर परिषदेतील २१ पैकी ११ जागा आणि आरमोरी नगर परिषदेतील २० पैकी १० जागा स्त्रियांसाठी राखीव आहेत.यामध्ये विविध प्रवर्गातील स्त्रियांना संधी मिळाली आहे.गडचिरोलीत सर्वसाधारण गटातील ६ जागा,देसाईगंजमध्ये सर्वसाधारण गटातील ६ जागा आणि आरमोरीमध्ये सर्वसाधारण गटातील ३ जागा स्त्रियांसाठी राखीव आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसल्यास देशव्यापी आंदोलनाचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आगामी जनगणनेमध्ये इतर मागासवर्गीय(OBC)समाजाची स्वतंत्रपणे नोंद होण्यासाठी स्वतंत्र कॉलम उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी ओबीसी समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.यासंदर्भात संघटनेने देशाचे...

जिल्हा परिषद पदभरती; १९२ उमेदवारांची अंतिम प्रतीक्षा सूची जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड मधील रिक्त असलेली विविध संवर्गांची पदे अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून शैक्षणिक अर्हता व...

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रवेशिका आमंत्रित.. – हौशी मराठी,हिंदी,संगीत,संस्कृत तसेच बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी,हिंदी,संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा...

फिरत असतांनाच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-प्रकृती निरोगी राहण्यासाठी नियमित सकाळी फिरायला जाणे व जिम करणे,अशी दिनचर्या सुरू केलेली असतांनाच घराबाहेर पडलेल्या एका अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!