- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-छत्तीसगडच्या बीजापूर जिल्ह्यातील गोमवेटा गावची रहिवासी असलेल्या ‘सुनीता’ नामक महिला नक्षलवादीने मध्य प्रदेशच्या बालाघाट जिल्ह्यातील पितकोना पोलीस चौकी अंतर्गत येणाऱ्या चिलोरा कॅम्प येथील पोलिसांपुढे आज मंगळवारी शरणागती पत्करली असून यामुळे नक्षलवादी संघटनेला मोठा धक्का बसला आहे. आत्मसमर्पण केलेल्या सुनीतावर शासनाने बालाघाट जिल्ह्यात १४ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.राज्यात नक्षलवाद्यांवर वाढलेल्या पोलीस दबावामुळे सुनीताने आत्मसमर्पण करण्याचा निर्णय घेतला असल्याचे पोलीस महानिरीक्षक संजय कुमार यांनी स्पष्ट केले आहे.विशेष म्हणजे,१९९२ नंतर पहिल्यांदाच दुसऱ्या राज्यातील महिला नक्षलवादीने मध्य प्रदेश शासनासमोर अशा प्रकारे स्वतःहून आत्मसमर्पण केले आहे.सुनीता ही २०२२ मध्ये नक्षलवादी संघटनेत सामील झाली होती.त्यावेळेस ती एमएमसी झोनची सक्रिय सदस्य म्हणून कार्यरत होती.
छत्तीसगडच्या माड क्षेत्रात तिने सहा महिन्यांचे कठोर प्रशिक्षण घेतले होते.त्यानंतर तिला सीसी मेंबर रामदेरच्या क्षेत्रात गार्ड म्हणून महत्त्वाचे काम देण्यात आले होते.सुनीताचा कोणकोणत्या गुन्ह्यांमध्ये सहभाग होता,याबद्दल तिची कसून चौकशी करण्यात येईल,असे संजय कुमार यांनी स्पष्ट केले आहे.
- Advertisement -

