उद्रेक न्युज वृत्त :- ‘अरण्य’ नामक मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.चित्रपट एका नक्षलवाद्याच्या जीवनावर आधारीत असून मुलीशी असलेल्या नात्याचा आणि हिंसेच्या मार्गाऐवजी शिक्षण व शांततेचा स्वीकार करणाऱ्या प्रवासाची कहाणी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच ‘अरण्य’ या मराठी चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले.लेखक-दिग्दर्शक अमोल दिगांबर करंबे यांनी या चित्रपटाच्या माध्यमातून सामाजिक वास्तव आणि मानवी भावनिक नाते उलगडण्याचा प्रयत्न केला आहे.येत्या १९ सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पोस्टरचे अनावरण करतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “सिनेमात परिवर्तनाची कथा सांगण्याची ताकद आहे. ‘अरण्य’ हा अशा लोकांचा प्रवास दाखवतो, ज्यांनी हिंसेऐवजी शिक्षण आणि शांततेचा मार्ग स्वीकारला.हा चित्रपट प्रेक्षकांवर नक्कीच प्रभाव टाकेल,असा मला विश्वास आहे.यांची ‘एक तिकीट, एक वृक्ष’ लावायची ही संकल्पना मला विशेष भावली.” एस.एस. स्टुडिओ आणि एक्सपो प्रेसेंट या बॅनरखाली शरद पाटील आणि अंजली पाटील यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम हार्दिक जोशी या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्यासोबत हृतीका पाटील,वीणा जगताप, विजय निकम,सुरेश विश्वकर्मा,अमोल खापरे आणि चेतन चावडा यांच्या भूमिका असतील. चित्रपटातील संगीत हे आदिवासी लोककलेवर आधारित असून प्रेक्षकांना एक वेगळा आणि अस्सल अनुभव मिळणार आहे.
नक्षलवाद्याच्या जीवनावर आधारीत ‘अरण्य’ मराठी चित्रपट येतोय प्रेक्षकांच्या भेटीला..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

