Wednesday, September 2, 2026
Homeगोंदियादोन तळीरामांनी रस्त्यातच थांबवली बस अन् घातला धिंगाणा…-दोघांवर गुन्हा दाखल…

दोन तळीरामांनी रस्त्यातच थांबवली बस अन् घातला धिंगाणा…-दोघांवर गुन्हा दाखल…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गोंदिया :- प्रवासी भरून अर्जुनी मोरगावातून भंडाराकडे निघालेली एसटी बस रस्त्यात अडवून बसमध्ये चढून दोन मद्यधुंद व्यक्तींनी धिंगाणा घालून एसटीच्या मालमत्तेचे नुकसान केले.ही घटना अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोंडगावदेवी येथे गुरुवारी दुपारी ३.२० वाजताच्या सुमारास घडली.

भंडारा आगाराची एमएच-४०/एआय ५३६१ क्रमांकाची एसटी बस प्रवासी भरून गुरुवारी अर्जुनी मोरगाव येथून भंडाराकडे जाण्यास निघाली होती. दरम्यान बोंडगावदेवी येथील रस्त्यावर मद्यधुंद अवस्थेत असलेल्या जयप्रकाश पंढरी बारसागडे वय ३२ वर्षे आणि गजानन मणिराम बारसागडे वय ३४ वर्षे दोन्ही रा.बोंडगावदेवी यांनी रस्त्याच्या मधोमध उभे राहून बस अडविली.बसचालकाने बस थांबविल्यानंतर ते दोघेही बसमध्ये चढले.त्यानंतर त्यांनी बसच्या बेलची दोरी तोडून वाहक तेजस्व लेखीराम वंजारी वय ४३,रा.वरठी,जि.मोहाडी यांना आम्हाला बस चेक करायची आहे; असे म्हणत वाहकाला शिवीगाळ केली.वाहकाचे कॉलर पकडल्याने शर्टचे बटन तुटले.शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या कारणावरून वाहकाच्या तक्रारीनुसार अर्जुनी मोरगाव पोलिसांनी दोन्ही दारुड्यांविरोधात गुन्हा नोंदविला असून तपास महिला पोलिस उपनिरीक्षक अश्विनी कदम करीत आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रवेशिका आमंत्रित.. – हौशी मराठी,हिंदी,संगीत,संस्कृत तसेच बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी,हिंदी,संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा...

फिरत असतांनाच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-प्रकृती निरोगी राहण्यासाठी नियमित सकाळी फिरायला जाणे व जिम करणे,अशी दिनचर्या सुरू केलेली असतांनाच घराबाहेर पडलेल्या एका अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू...

ग्रामसेवकांची वर्षातून केवळ एकच संवैधानिक ग्रामसभा घेण्याची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्याच्या शिवरे दिगर येथे १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास ग्रामसभे दरम्यान झालेल्या गोंधळ व दबावामुळे...

जागतिक नारळ दिन विशेष..! नारळ लागवड; शाश्वत उत्पन्नाचा ‘कल्पवृक्ष’..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आज बुधवार २ सप्टेंबर दरवर्षी २ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक नारळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. नारळाच्या झाडाचा जवळपास प्रत्येक भाग उपयोगात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!