Monday, August 31, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तशून्य इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याचे फायदे..! घ्या जाणून..

शून्य इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याचे फायदे..! घ्या जाणून..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- आयकर रिटर्न (ITR) भरण्याची वेळ आता जवळ येत असून इन्कम टॅक्स रिटर्न (प्राप्तिकर) बाबत अनेकांना असे वाटते की करपात्र उत्पन्न नसेल तर त्यांना रिटर्न भरण्याची गरज नाही.आयटीआर भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२४ आहे; त्यामुळे आयकर विभागाने करणदात्यांना कोणताही विलंब न करता लवकरात लवकर रिटर्न फाईल करण्यास सांगितले आहे.दरम्यान,करपात्र उत्पन्न असेलेले आयटीआर भरण्यापासून बहुतेक लोक परिचित आहेत; परंतु आयकर कायद्यात शून्य किंवा Nil रिटर्न फाईल करण्याचीही तरतूद आहे.

जर एखाद्या करदात्याने वार्षिक एकूण उत्पन्न करपात्र नसेल तर त्याने Nil किंवा शून्य आयटीआर फाईल करावा.Nil आयटीआर भरून तुम्ही आयकर विभागाला आपल्या उत्पन्नाची माहिती देणे अनिवार्य आहे.एखाद्या करदात्याची वार्षिक कमाई २.५० लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर त्याच्यावर कोणतेही करदायित्व नाही.

वार्षिक उत्पन्न पाच लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर आयकर रिटर्न दाखल करण्याची गरज नाही; असा बऱ्याच लोकांचा समज आहे; पण तसे नाही.वार्षिक उत्पन्न पाच लाखांपेक्षा कमी असेल तर एक रुपयाही कर भरावा लागत नाही कारण आयकर कायद्याच्या कलम ८७ए अंतर्गत १२,५०० रुपयांची सूट मिळते तर सूटची वास्तविक मर्यादा आता अडीच लाख रुपये आहे.

एखादा करदाता रिफंडचा दावा करण्यासाठी शून्य रिटर्न दाखल करू करतो.एखाद्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असण्याच शक्यता आहे; परंतु फॉर्म १५H/G सबमिट करण्यास विसरल्यामुळे बँकेने व्याजातून TDS कापला गेला असेल तर तुम्ही कपात केलेल्या कराचा दावा (रिफंड) करण्यासाठी शून्य रिटर्न दाखल करू शकता.

तुमचे कोणतेही उत्पन्न करपात्र नसले तरीही शून्य किंवा Nil आयकर रिटर्न दाखल केल्यास कर नियमांचे पालन केल्याची खात्री होते.यामुळे कर्ज, व्हिसा किंवा उत्पन्नाचा पुरावा आवशयक असलेल्या इतर आर्थिक व्यवहारांसाठी अर्ज करताना तुमच्या पथ्यावर पडू शकते.याशिवाय एखाद्या बँकेत कर्ज किंवा क्रेडिट कार्डसाठी कर्ज केला आणि बँकेने उत्पन्नाचा पुरावा मागितले तर तुम्ही भरलेल्या शून्य म्हणजे Nil आयटीआर उत्पन्नाचा पुरावा म्हणून जमा करू शकता.शून्य ITR भरण्याचा अजून एक फायदा म्हणजे स्वतःच्या नावावर असलेली एखादी जमीन किंवा घर तुम्ही सहज विकता येते.

अशाप्रकारे शून्य ITR दाखल करून कोणतेही नुकसान होत नाही; पण नक्कीच अनेक फायदे मिळतात.विशेषत: तुम्हाला कधी अचानक गरज भासली आणि लाखभर रुपयांचे कर्ज घ्यायचे असेल, तर झिरो आयटीआर तुमच्या खूप उपयुक्त ठरू शकते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाघाच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील मोहर्ली वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मोहर्ली वनपरिक्षेत्राच्या मोहर्ली बिटातील १५४ कक्ष क्रमांकात...

ई-पीक पाहणी नोंद घेणाऱ्यांकडून पैश्याची मागणी; तहसील कार्यालयात करा तक्रार..

उद्रेक न्युज वृत्त :-शासनाने 'खरीप हंगाम-२०२६' साठी ई-पीक पाहणीच्या कार्यपद्धतीत बदल करून गावनिहाय नियुक्त करण्यात आलेल्या पीक पाहणी सहाय्यकांमार्फत पिकांची नोंद करण्यात येत आहे.विशेष म्हणजे,शासकीय योजना,पीक कर्ज...

पुष्पा स्टाईलने सागवान लाकूड तस्करीचा डाव.. – घेराबंदी घालताच तस्करांनी ठोकली धूम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा: द राईज' हा लोकप्रिय चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे.आंध्र प्रदेशच्या शेषाचलम जंगलातील लाल...

तब्बल बारा दिवसांपूर्वी आलेल्या धमकीच्या ‘ई-मेल’ ची धास्ती; उद्याला शाळांना सुट्टी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहरातील तब्बल डझनहून अधिक नामांकित शाळांसह १९ ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल मंगळवार १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!