Saturday, March 15, 2025
Homeगडचिरोलीदेसाईगंज शहरात मतदान जनजागृतीपर मॅराथॉनचे आयोजन...
spot_img

देसाईगंज शहरात मतदान जनजागृतीपर मॅराथॉनचे आयोजन…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-लोकशाही बळकट करण्याचा उद्देशाने प्रत्येक नागरीकांनी आपल्या मतदानाचे हक्क बजावणे आवश्यक आहे.याबाबत जनजागृती निर्माण करून मतदानाची टक्केवारी वाढविण्याकरीता शासन स्तरावरून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.या अंतर्गत आरमोरी विधान सभा मतदार संघ तथा उपविभागीय अधिकारी,देसाईगंज व डॉ.कुलभुषण रामटेके मुख्याधिकारी नगर परिषद देसाईगंज यांचे मार्गदर्शनात देसाईगंज नगर परिषद क्षेत्रात मतदान जागृतीकरीता मॅराथॉनचे आयोजन करण्यात आले. नगर परिषदेचे कार्यालय अधिक्षक प्रमोद येरणे यांनी हिरवी झेंडी दाखवून मॅराथॉन ला सुरुवात करण्यात आली.मॅराथॉनचा मार्गक्रम नगर परिषद कार्यालय, हूतात्मा स्मारक ते थोरात चौक ते फवारा चौक ते नगर परिषद सांस्कृतिक भवन असा होता.
यावेळी नगर परिषदेचे लेखापाल अविनाश राठोड, श्रीकांत वरकडे,अभियंता आशिष गेडाम,
निशान घोनमोडे,कर निरीक्षक प्रफूल हटवार,स्वप्नील हमाने,सहायक प्रकल्प अधिकारी लवकुश उरकुडे, कुथे पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य महेश भावे, महात्मा गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक महेश मुंडले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाचे शिक्षक जिभकाटे,अंबादे व मो.सरीफ कनिष्ट महाविद्यालयाचे प्राचार्य शाहीन,केंद्र प्रमुख अंबाजी आमनार,लिपीक वैशाली कुमरे,आम्रपालि चहांदे,लिडींग फायरमन राजू निंबेकर,हरगोविंद भुरे,विनोद मरस्कोल्हे,घनश्याम कांबळे,शितल सोनवाने,अरुण मोटघरे,जवाहर सोनेकर,विलास बोंदरे,प्रफुल दुपारे,राहूल भुरे,पिंकु सोनेकर व नगर परिषदेचे ईतर कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.यामध्ये महात्मा गांधी विद्यालय,कुथे पाटील महाविद्याल,डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यालय व मो.सरीफ कनिष्ट महाविद्यालयाचे महाविद्यालयाचे विद्यार्थी-विद्यार्थीनी सहभागी झाले होते.
Udrek News

- Advertisement -
spot_imgspot_img

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद चंद्रपुरात..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यात उन्हाळा कडकु लागला आहे.त्यातच विदर्भात बहुतांश ठिकाणी उष्णतेची लाट आहे.आज,शनिवार १५ मार्च रोजी अकोला, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज...

नक्षलवाद्यांनी जंगलात पुरून ठेवलेली स्फोटके पोलिसांनी केली नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील नक्षलवाद संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे.मोठ-मोठी नक्षली स्वतःहून पोलिसांपुढे आत्मसमर्पण करीत आहेत.काही नक्षली दाम्पत्य हिंसक मार्ग सोडून सुखी संसाराची स्वप्ने रंगवू लागली...

आत्ताची मोठी बातमी.. पाच मुलांचा घोडाझरी तलावात बुडून मृत्यू; दोन सख्खे भाऊ तर दोन चुलत भाऊ व एक मित्र..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातील घोडाझरी येथे पर्यटनासाठी गेलेल्या सहा मुलांपैकी पाच मुलांचा  तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज,शनिवार १५ मार्च रोजी सायंकाळी ४...

फेसबुकवर भावनिक पोस्ट करीत बँकेच्या दारातच शिक्षकाने गळफास घेऊन केली आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  बीड :-शहरातील कृष्णा अर्बन बँकेच्या दारातच एसीच्या ग्रीलला गळफास घेऊन एका शिक्षकाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना आज,शनिवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे.शिक्षकाने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!