Monday, June 1, 2026
Homeगडचिरोलीदेसाईगंजच्या तुळशी येथे खरीपपूर्व भात लागवड प्रशिक्षण संपन्न..

देसाईगंजच्या तुळशी येथे खरीपपूर्व भात लागवड प्रशिक्षण संपन्न..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा(आत्मा)गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने देसाईगंज तालुक्याच्या मौजा-तुळशी येथे खरीप हंगामपूर्व भात लागवड प्रशिक्षण व प्रात्यक्षिक कार्यक्रम उत्साहात पार पडला.या कार्यक्रमात सगुणा भात लागवड तंत्रज्ञान(SRT),पेरणी यंत्राद्वारे भात लागवड (DSR),माती परीक्षण व बीज प्रक्रिया याबाबत शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतावर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्मा प्रीती हिरळकर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या.त्यांनी शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा अनियंत्रित वापर टाळून नैसर्गिक व सेंद्रिय शेतीकडे वळावे,असे आवाहन केले.जमिनीचे आरोग्य टिकवण्यासाठी बीजामृत,जीवामृत,घनजीवामृत,दशपर्णी अर्क,हिरवळीची व कंपोस्ट खते तसेच पीक फेरपालट यांचा अवलंब करण्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी मंडळ कृषी अधिकारी पी.डी.खंडाळे यांनी सगुणा भात लागवड तंत्रज्ञानाची माहिती देत शून्य मशागत पद्धतीचे फायदे स्पष्ट केले.आत्माचे बीटीएम व्ही.डी.रहांगडाले यांनी एसआरटी(SRT)पद्धतीमुळे नांगरणी,चिखलणी,रोवणी व इंधन खर्चात बचत होऊन जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत होते,असे सांगितले.सहाय्यक कृषी अधिकारी अतुल देशमुख यांनी डीएसआर (DSR)पद्धतीची माहिती देत या तंत्रज्ञानामुळे चिखलणी व रोवणीचा खर्च कमी होतो,असे स्पष्ट केले.तर कल्पना ठाकरे यांनी माती परीक्षणाचे प्रात्यक्षिक करून खत व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले.
आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक पाहून उपस्थित शेतकऱ्यांनी एसआरटी व डीएसआर पद्धतीबाबत उत्सुकता व्यक्त केली तसेच लागवडीसाठी यंत्रांची मागणीही केली.
कार्यक्रमास देसाईगंज शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष सुनील पारधी,संचालक मेघनाथ दुनेदार, तुळशीचे सरपंच नाकाडे,उपसरपंच सुरेश तोंडफोडे,कृषी विभागाचे अधिकारी-कर्मचारी व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे नियोजन व्ही.डी.रहांगडाले यांनी केले,तर नितीन मुदामवार,अतुल देशमुख व सुरेश तोंडफोडे यांनी परिश्रम घेतले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दुचाकीचे संतुलन बिघडल्याने खाली कोसळला; तितक्यातच बस आली अन् अनर्थ घडला.. – तरुणाचा जागीच मृत्यू; तर महिला गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-दुचाकीने स्वगावी जाण्यासाठी निघालेल्या तरुणाचा वाटेतच रस्ते अपघातात मृत्यू झाल्याची घटना आज,सोमवार १ जून रोजी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास भंडारा...

वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली मतदार संघाकरिता निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीची घोषणा केली असून त्यासाठी येत्या,१८ जून २०२६ रोजी मतदान तर २२...

दोन तरुणांची इन्स्टाग्रामवर ओळख; ओळखीचे रूपांतर प्रेमात.. – एकतर्फी प्रेमात बुडालेल्या तरुणाने प्रियकर तरुणाचा चिरला गळा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सोशल मीडियाच्या इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या दोन तरुणांचे प्रेम बहरून आले.अश्यातच 'आपण लग्न करू' असे एकतर्फी प्रेमात बुडालेल्या तरुणाने तगादा लावला.मात्र,अगोदरच विवाहित...

२० वर्षीय तरुणाचा १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; तरुणाला बेड्या..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या एका २० वर्षीय तरुणाने १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे खोटे आमिष दाखवले व नंतर वारंवार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!