उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- काही दिवसांपासून हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार आज २६ मार्च रोजी दुपारी ४.३० च्या सुमारास गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज व आरमोरी तालुक्यात मेघ गर्जनेसह अवकाळी पावसाने हजेरी लावली.
हल्ली उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत.अशातच अवकाळी पावसामुळे अनेकांना काही प्रमाणात नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.दिवसा ऊन तर दुपारी व सायंकाळी पाऊस येत असल्याने नागरिकही संभ्रमात आहेत.काहीजण मिरची,मुंग,सांभार धने व इतर शेत माल उन्हात वाळवीण्यासाठी बाहेर ठेवतात.मात्र अचानक येणाऱ्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नागरिकांना धावपळ करावी लागत आहे.
देसाईगंज,आरमोरी तालुक्यात आज दुपारी दमदार पावसा सोबतच काही ठिकाणी विजांचे कडकडाट व मेघ गर्जना पहावयास मिळाली.देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा येथे सुमारे अर्धा तास सुरू असलेल्या पावसात बारीक-बारीक गारपीट माऱ्या सोबतच विजांचे कडकडाट मोठ्या प्रमाणावर झाले आहे.अवकाळी पावसामुळे लहान बालकांना ताप,सर्दी,खोकला व इतर आजार होण्याची शक्यता बळावली असल्याने लहान बालकांसोबतच नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.