Thursday, July 9, 2026
Homeगडचिरोलीदेशातील पहिल्या डिजिटल जनगणनेत प्रथमच स्व-गणना सुविधा..

देशातील पहिल्या डिजिटल जनगणनेत प्रथमच स्व-गणना सुविधा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-भारतातील पहिली डिजिटल जनगणना म्हणून ओळखली जाणारी जनगणना-२०२७ ही देशासाठी अत्यंत महत्त्वाची आणि व्यापक प्रक्रिया असून,यात स्व-गणनेच्या माध्यमातून सहभाग नोंदविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.
जनगणना-२०२७ ही दोन टप्प्यांत पार पडणार असून, पहिला टप्पा–घरयादी व घरगणना १६ मे २०२६ ते १४ जून २०२६ या कालावधीत होणार आहे.त्यानंतर दुसरा टप्पा–लोकसंख्या गणना फेब्रुवारी २०२७ मध्ये सुरू होणार आहे.या संपूर्ण प्रक्रियेत अचूक व विश्वसनीय माहिती संकलनावर भर दिला जाणार आहे.
यंदाच्या जनगणनेत प्रथमच स्व-गणना(Self Enumeration)ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.नागरिकांना स्वतःच्या मोबाईल किंवा संगणकाद्वारे https://se.census.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन आपल्या कुटुंबाची माहिती भरता येणार आहे.ही सुविधा १ मे २०२६ ते १५ मे २०२६ या कालावधीत उपलब्ध राहणार आहे.स्व-गणना पूर्ण केल्यानंतर मिळणारी Self Enumeration ID (SE ID)जतन करून ठेवणे आवश्यक असून,प्रगणक घरी आल्यावर ही ID त्यांना देणे बंधनकारक राहणार आहे.
शहरी तसेच ग्रामीण भागातील सर्व नागरिकांनी या स्व-गणना सुविधेचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.या उपक्रमामुळे नागरिकांना जनगणनेच्या कार्यात थेट सहभाग नोंदवण्याची संधी मिळणार आहे.
जनगणनेतून मिळणारी आकडेवारी पुढील दहा वर्षांसाठी शिक्षण,आरोग्य,पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा,रेशन तसेच रोजगार योजनांच्या प्रभावी नियोजनासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.त्यामुळे प्रत्येक नागरिकाने अचूक माहिती नोंदवणे ही आपली जबाबदारी समजून सहभाग नोंदवावा,असेही त्यांनी स्पष्ट केले.
स्व-गणना प्रक्रियेदरम्यान कोणतीही अडचण आल्यास संबंधित तहसील कार्यालय किंवा नगर परिषद/नगरपंचायत कार्यालयाशी संपर्क साधावा,असेही आवाहन करण्यात आले आहे.सर्वांनी जबाबदारी ओळखून जनगणना-२०२७ मध्ये सक्रिय सहभाग नोंदवून जिल्ह्याची जनगणना यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

यांना म्हणतात खरे ‘लोकसेवक’..! आरोग्य उपकेंद्रात अचानकपणे मध्यरात्रीच धडकले जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-कोणी कितीही मोठा अधिकारी कां असेना..! तो शासनाचा नोकर,तर जनतेचा लोकसेवक म्हणून शासनाकडून पगार घेतो.पण,काही अधिकारी स्वतःला मोठे अधिकारी समजून खुर्चीच्या...

गडचिरोली शहरासाठी २३ किलोमीटर लांबीचा चारपदरी बायपास रोड प्रस्तावित..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोलीतील वाढत्या औद्योगिकीकरणामुळे शहरातील जड वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार सार्वजनिक बांधकाम विभाग व...

आता गावातील स्मशानभूमीचा दाखल द्या अन् विविध योजनेचा निधी मिळवा.. – ग्रामीण भागात तब्बल ७ हजार ४४४ गावांमध्ये स्मशानभूमीच नाही..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील ग्रामीण भागात आजही तब्बल ७ हजार ४४४ म्हणजेच जवळपास २० टक्के गावांमध्ये स्मशानभूमीच उपलब्ध नसल्याने पावसाळ्यात नागरिकांना मरणयातना सहन कराव्या...

लॉजमध्येच सुरू होता देहव्यापाराचा अड्डा; लॉज मालकाविरुद्ध गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-नुकतेच चार दिवसांपूर्वी वर्धा शहराच्या कारला रोडलगत असलेल्या वैष्णवी कॉम्पलेक्स जवळील नखाते लेआऊट परिसरात स्वतःच्याच घरी देहव्यापाराचा अड्डा चालवणाऱ्या पती-पत्नीला पोलिसांनी रंगेहाथ अटक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!