Sunday, September 6, 2026
Homeगडचिरोलीदुचाकी झाडावर आदळली अन् बीचाऱ्याचा जीवच गेला.!

दुचाकी झाडावर आदळली अन् बीचाऱ्याचा जीवच गेला.!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-पत्नी व मुली गावी गेल्याने त्यांना आणण्यासाठी दुचाकीने जात असतांनाच वाटेतच दुचाकीवरील नियंत्रण सुटून दुचाकी झाडावर आदळली. यात तो गंभीर जखमी झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना काल शुक्रवारी गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरी तालुक्यातील आलापल्ली-एटापल्ली मार्गावरील मद्दीगुडम गावाजवळील वळणावर घडली.यात ३५ वर्षीय दिलीप मधुकर सडमेक रा.ता.अहेरी याचा मृत्यू झाला.
माहितीनुसार,दिलीप सडमेक हा काल दुपारच्या सुमारास पत्नी व १० वर्षीय आणि ८ वर्षीय मुलींना आणण्यासाठी दुचाकीने सासुरवाडीला जात होता. पत्नी व दोन मुली एटापल्ली येथे दोन दिवसांपूर्वी गेल्या होत्या.अश्यातच दुचाकीने जात असतांना वाटेतच काळाने झडप घातली आणि सुखी परिवारात काळोख पसरला.दिलीप हा शासकीय रुग्णालयात कंत्राटी सफाई कामगार म्हणून काम करीत होता.मात्र,कंत्राटाची मुदत संपल्याने तो बांधकामावर मिस्त्रीचे काम करायचा.त्यातच नकळत कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचे आधारवड गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गांजाची वाहतूक; तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त,दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ओडिशातून आणलेला तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त केला.कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले...

शिक्षक दिन व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.. -शिष्यवृत्ती परीक्षेत देसाईगंज नगर परिषद शाळेचे १४ विद्यार्थी पात्र..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी सोहळा आज,शनिवार ५ सप्टेंबर रोजी नगर परिषद देसाईगंजच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात...

बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल कसा होणार? – न्यायालयाने आरोपीवरील दाखल गुन्हे केले रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणला वा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल तरी कसा होणार? असे म्हणत...

शिक्षक दिन उत्साहात संपन्न; ‘ज्ञानमित्र’ उपक्रमातून विद्यार्थी बनले विद्यार्थ्यांचे शिक्षक..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंजच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड येथे आज,शनिवार ५ सप्टेंबरला शिक्षक दिन व स्वयंशासन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!