- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या १७ जून २०१४ च्या शासन निर्णयानुसार दिव्यांग व्यक्तींच्या विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक सहाय्य योजना सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार दिव्यांग-अव्यंग व्यक्तींच्या विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक सहाय्य योजनेअंतर्गत प्राधान्यक्रमानुसार पात्र असलेल्या ११ जोडप्यांपैकी प्रातिनिधिक स्वरूपात ३ लाभार्थी जोडप्यांना आज,गुरुवार १७ एप्रिल रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांचे हस्ते जिल्हा परिषद सभागृहात प्रती जोडपे ५० हजार याप्रमाणे बचत प्रमाणपत्र,धनादेश व भेटवस्तू देण्यात आल्या.यासोबतच राज्यस्तरीय दिव्यांग मुलांच्या क्रीडा स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील ४ विद्यार्थ्यांचा देखील सुहास गाडे यांच्या हस्ते सत्कार करून गौरव करण्यात आला.कार्यक्रमास जिल्हा समाजकल्याण अधिकारी चेतन हिवंज प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजनात सहाय्यक प्रकल्प अधिकारी वर्षा ढवळे,सहाय्यक लेखा व प्रशासन अधिकारी पुष्पा पारसे,विस्तार अधिकारी जगदीश मेश्राम,समाजकल्याण निरीक्षक निलेश तोरे तसेच निखील उरकुडे,माया गायकवाड,नरेश नायक यांचा सहभाग होता. समाजकल्याण विभागाचे तसेच दिव्यांग शाळांचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
- Advertisement -

