Thursday, September 10, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्त'त्या' वकिलाला चपलाचा प्रसाद; व्हिडिओ व्हायरल.

‘त्या’ वकिलाला चपलाचा प्रसाद; व्हिडिओ व्हायरल.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-सर्वोच्च न्यायालयात ६ ऑक्टोंबर २०२५ रोजी सुनावणीदरम्यान घडलेल्या घटनेने सर्वत्र तीव्र पडसाद उमटले होते.न्यायालयाच्या कोर्ट नंबर एकमध्ये मध्य प्रदेशातील खजुराहो येथील जवारी मंदिरातील भगवान विष्णूची छिन्नविच्छिन्न मूर्ती परत बसवण्याच्या प्रकरणावर नियमित सुनावणी सुरू होती. सुनावणीदरम्यान सकाळी सुमारे ११:३५ वाजता ७१ वर्षीय वकील राकेश किशोर यांनी अचानक पायातील बूट काढून माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती बी.आर.गवई यांच्याकडे फेकण्याचा प्रयत्न केला.त्यावेळी उपस्थित वकील आणि सुरक्षा कर्मचारी यांनी त्यांना तातडीने रोखले.या सर्व घडामोडीमुळे न्यायालय परिसरात तणाव वाढला होता.त्यावेळी सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना त्वरित पकडले होते.मात्र,यानंतरही गवई यांनी त्यांना माफ केले होते.राकेश किशोर यांना या घटनेनंतर बार काऊन्सिलने निलंबित केले आहे.त्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत त्यांना कायदेशीर प्रकरणांमध्ये कोणतेही काम करता येणार नाही.विरोध आणि टीका होत असूनही राकेश किशोर यांनी त्यांच्या कृतीबद्दल खेद व्यक्त केला नव्हता.उलट, त्यांनी हे करतांना “भगवानाने स्वप्नात सांगितले” असा दावा केला होता.अश्यातच आता माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती बी.आर.गवई यांच्यावर बूट फेकणारे वकील राकेश किशोर यांना आज,मंगळवार ९ डिसेंबर रोजी दिल्लीतील न्यायालय परिसरात काही वकिलांनी चपलाचा प्रसाद दिल्याची घटना घडली आहे.याबाबत सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला आहे.ही घटना त्या वेळी घडली,जेव्हा ते न्यायालय परिसरात उपस्थित होते.काही वकिलांनी त्यांना धक्काबुक्की केली आणि चपलांनी हल्ला केला.परिस्थिती बिघडू नये म्हणून न्यायालयातील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप करून त्यांना तातडीने बाहेर नेले.राकेश किशोर हे दिल्ली बार कौन्सिलमध्ये २००९ पासून नोंदणीकृत वरिष्ठ वकील आहेत.
व्हायरल व्हिडिओ👇
 
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन,वारसा हक्क,पदोन्नती व निवासाच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करा- राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागरिकांचे आरोग्य आणि सार्वजनिक स्वच्छता राखण्यात सफाई कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे.त्यामुळे त्यांच्या वेतन,सेवा,आरोग्य, निवास व आर्थिक सुरक्षिततेशी संबंधित प्रलंबित प्रश्नांचा...

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत विद्यार्थ्यांमध्ये उत्तम मूल्यसंस्कार रुजविणे काळाची गरज-शिक्षणमंत्री दादाजी भुसे – ‘चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत आज विविध शाळांना प्रत्यक्ष भेटी.. – पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शाळेत केवळ पुस्तकी ज्ञान देणे पुरेसे नसून गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच भावी पिढीवर राष्ट्रभक्तीचे आणि उत्तम मूल्यांचे संस्कार रुजवणे गरजेचे आहे.गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातही...

अजब लाचेची गजब कहाणी..! दोन्ही हातांच्या दहा बोटांचा इशारा करून मागितली १० हजाराची लाच.. – पोलीस उपनिरीक्षक व पोलीस अंमलदार एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  छत्रपती संभाजीनगर :-राज्याच्या विविध भागात सरळ-सरळ तोंडी बोलणी करून अनेकजण लाच घेतांना व एसीबीच्या जाळ्यात अडकतांना दिसून येतात.पण, नुकतेच छत्रपती संभाजीनगर(पूर्वीचे औरंगाबाद)शहरात...

उद्याला बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप..!

उद्रेक न्युज वृत्त :-युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स(यूएफबीआय)या बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या संयुक्त संघटनेने उद्या,शुक्रवार ११ सप्टेंबर रोजी एक दिवसीय देशव्यापी संपाची हाक दिली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!