Wednesday, September 9, 2026
Homeगडचिरोली'तिसरा डोळा' तासभर बंद? प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तसंदर्भात प्रशासनाचे स्पष्टीकरण.. - आरमोरी...

‘तिसरा डोळा’ तासभर बंद? प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तसंदर्भात प्रशासनाचे स्पष्टीकरण.. – आरमोरी नगरपरिषद क्षेत्रातील प्रकरण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-नुकतीच २ डिसेंबर रोजी आरमोरी नगरपरिषद निवडणूक मतदानाची प्रक्रिया पार पडली. प्रत्यक्ष मतदानाचा निकाल हा येत्या २१ डिसेंबरला लागणार आहे.त्यामुळे मतदान केलेल्या ईव्हीएम मशीन ह्या स्ट्राँगरूममध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निगराणीत पोलिस बस्तात ठेवण्यात आल्या आहेत. अश्यातच रविवार ७ डिसेंबरच्या रात्री याच स्ट्रांग रुममधील सीसीटीव्ही कॅमेरे जवळपास तासभर बंद असल्याची तक्रार काँग्रेसच्या नगराध्यक्ष,नगरसेवक व उमेदवारांसह पदाधिकाऱ्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे केली.त्यामुळे याची सखोल चौकशी करुन स्ट्राँग रुममधील आतापर्यंतच्या सीसीटीव्ही कॅमेराची रेकॉर्डिंग द्यावी,अशीही मागणीही त्यांनी निवेदनातून केली होती.त्यातच ‘तिसरा डोळा’ तासभर बंद? या मथळ्याखाली प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तसंदर्भात प्रशासनाने स्पष्टीकरण सादर केले आहे.
प्रशासनाच्या मते,आरमोरी नगरपरिषद निवडणूक कार्यालयातर्फे कळविण्यात येते की,मतदान यंत्र सुरक्षा कक्षामध्ये बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेमधील एक कॅमेरा क्र.२ दिनांक-७ डिसेंबर २०२५ रोजीच्या रात्री एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये तांत्रिक बिघाड(IP service message return error)झाल्याची नोंद झाली होती.मात्र,इतर सर्व कॅमेरे पूर्णपणे सुरू व कार्यरत होते.सदर बिघाडाची माहिती मिळताच त्वरित तांत्रिक पथकास पाचारण करण्यात आले,त्यानुसार तंत्रज्ञाने तातडीने कामास सुरुवात केली.तसेच त्यादरम्यान बिघाड दुरुस्त होण्यासाठी सुमारे ४५ मिनिटांचा वेळ लागला, परंतु इतर कॅमेऱ्यांची रेकॉर्डिंग व्यवस्थितपणे सुरु होती. एक कॅमेरा दुरुस्त होईपर्यंत इतर कॅमेऱ्याचे रेकॉर्डिंग NVR मधील स्टोरेज डीवाईसमध्ये अखंडपणे सुरू होते. त्या कालावधीत कोणत्याही प्रकारची अनियमितता अथवा संशयास्पद हालचाल झालेली नाही.संपूर्ण मतदान यंत्र सुरक्षा कक्ष २ डिसेंबर २०२५ पासून पोलिस बंदोबस्तासह सीलबंद स्थितीत आहे.प्रशासन हेही स्पष्ट करते की,ईव्हीएम यंत्र सुरक्षा कक्षामध्ये पूर्णपणे सुरक्षित स्थितीत आहेत.मतदान सुरक्षा कक्षाच्या चारही बाजूंना २४×७ सुरक्षा यंत्रणा तैनात आहे. सीसीटीव्ही फूटेज नियमितपणे तपासले जात आहे, CCTV यंत्रणेतील कॅमेरा क्र.२ बंद झाल्याच्या स्थितीपासून तर पूर्ववत होईपर्यंत उमेदवार प्रतिनिधी चेतन निमगडे हे प्रत्यक्ष त्याठिकाणी उपस्थित होते.तसेच त्याबाबतची नोंद सुरक्षा कक्ष लॉगबुकमध्ये घेतलेली आहे.तसेच त्यांनी सदर परिस्थितीची पाहणी केली असून त्यांच्या व सुरक्षा अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदरहू कॅमेऱ्याचा तांत्रिक बिघाड यशस्वीरीत्या दुरुस्त करण्यात आला आहे.तसेच अतिरिक्त सिसिटीव्ही लावण्यात आलेले आहे.एक सीसीटीव्ही कॅमेरा काही वेळेसाठी बंद असल्यामुळे सूरक्षेवर परिणाम झाला आहे,असे वृत्त वस्तुनिष्ठ नाही. प्रशासनाने नियमांनुसार सर्व आवश्यक पावले तत्काळ उचलली आहेत.नागरिकांनी कोणत्याही गैरसमजाला बळी न पडता प्रशासनावर विश्वास ठेवावा,असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी  उषा चौधरी तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रितीश मगरे यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गणेशोत्सवात भक्तांच्या आरोग्याची काळजी; राज्यभर २० हजार मोफत आरोग्य तपासणी शिबिरे.. – सर्व ३६ जिल्ह्यांत उपक्रमाची व्याप्ती..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-श्रीगणेशोत्सवात भक्तांच्या आरोग्याची काळजी घेत मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या पुढाकाराने राज्यभर सुमारे २० हजार मोफत आरोग्य तपासणी...

राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष यांचा गडचिरोली दौरा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग रुक्कानसिंग डागोर हे उद्या,गुरुवार १० सप्टेंबर रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा...

कुलरमध्ये पाणी भरणे जीवावर बेतले; एकाचवेळी दोघांचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-कित्येकदा कुलर सुरू असतांना वा कुलरची बोर्डमध्ये लावलेली पिन न काढता कुलरमध्ये पाणी भरणे अनेकांच्या जीवावर बेतले आहे.बऱ्याच नागरिकांना कुलरच्या विद्युत प्रवाहाचा...

ग्रामस्थांनी लोकसहभागातून उभारली ‘जनकल्याणम्’ अभ्यासिका.. – आरमोरी तालुक्याच्या पळसगाव येथील उपक्रमाचे कौतुक..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण व स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आवश्यक सुविधा गावातच उपलब्ध करून देण्यासाठी आरमोरी तालुक्यातील पळसगाव येथे ग्रामस्थांनी लोकसहभागातून उभारलेली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!