Wednesday, August 12, 2026
Homeमध्य प्रदेश'त्या' जिल्हाधिकाऱ्यावर फुटले फटाके….!- ट्रक ड्रायव्हर सोबत बाचाबाची करणे भोवले…

‘त्या’ जिल्हाधिकाऱ्यावर फुटले फटाके….!- ट्रक ड्रायव्हर सोबत बाचाबाची करणे भोवले…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

मध्य प्रदेश :- मध्य प्रदेशातील शाजापूरमध्ये ड्रायव्हरला वादग्रस्त शब्द उच्चारणाऱ्या जिल्हाधिकारी किशोर कन्यालला अखेर शिक्षा झाली.या प्रकरणाची स्वतः मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी दखल घेत या अधिकाऱ्याची पदावरून उचलबांगडी केली.कन्यालला पदावरून हटवण्यासोबतच मुख्यमंत्री म्हणाले, मी स्वतः गरिबाचा पुत्र आहे. आमचे सरकारही गरिबांसाठीच आहे. सरकारमध्ये सर्वांचा सन्मान झाला पाहिजे. यासोबतच त्यांनी राज्यातील उर्वरित अधिकाऱ्यांनाही त्यांच्या भाषेवर नियंत्रण ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. किशोर कन्यालला पदावरून हटवल्यानंतर मध्य प्रदेश सरकारने रिजू बाफना यांना जिल्हाधिकारी बनवले आहे. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या ट्रक चालकांच्या संपादरम्यान जिल्हाधिकारी किशोर कन्याल यांनी शाजापूरमध्ये एका ट्रक चालकाला खडसावले होते. या घटनेचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी मागितली माफी👇

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आणि सरकारने दखल घेतल्यानंतर जिल्हाधिकारी किशोर कन्याल यांनीही स्पष्टीकरण दिले.याबद्दल त्यांनी माफी मागितली होती.त्यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, ट्रकचालकांसोबत झालेल्या बैठकीदरम्यान ही व्यक्ती कोणत्याही थराला जाण्याचे वारंवार सांगत होती. त्यामुळे त्याला शांत करण्यासाठी त्या शब्दात बोललो.कोणाच्याही भावना दुखावण्याचा त्यांचा हेतू नव्हता.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता राष्ट्रीय गीत असलेल्या ‘वंदे मातरम्’ला कायदेशीर संरक्षण प्राप्त.. -कोणत्याही शासकीय कार्यक्रमात ‘वंदे मातरम्’ प्रथम गायले जाईल..

उद्रेक न्युज वृत्त :-देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल मंगळवारी 'राष्ट्रीय प्रतिष्ठा अवमान निवारण (सुधारणा)विधेयक २०२६' ला मंजुरी दिल्याने आता राष्ट्रीय गीत असलेल्या 'वंदे मातरम्'ला...

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत पिकांच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटला.. – कुरखेडा तालुक्यातील शेतकऱ्याने सांगितला आनंददायक अनुभव..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :- "नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोकरा)योजनेअंतर्गत मी ३० पाईपची मागणी केली होती.पाईप खरेदी केल्यानंतर अवघ्या ८ दिवसांच्या आत माझ्या खात्यात ८०...

कारची ट्रकला मागून जोरदार धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीत आज,बुधवार १२ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दोन अल्पवयीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला; तर...

सर्पदंश दुर्घटनेनंतर प्रशासनाची कठोर कारवाई; मुख्याध्यापक व दोन वसतिगृह अधीक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल.. – आश्रमशाळा बंद करण्याची शासनाकडे शिफारस..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनेची जिल्हा प्रशासन आणि आदिवासी विकास विभागाने गंभीर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!