Friday, May 1, 2026
Homeगडचिरोली'त्या' आठ शिक्षकांवर कारवाईची टांगती तलवार.. - क्रीडा संमेलन तथा सांस्कृतिक महोत्सवात...

‘त्या’ आठ शिक्षकांवर कारवाईची टांगती तलवार.. – क्रीडा संमेलन तथा सांस्कृतिक महोत्सवात मद्यप्राशन करणे भोवले..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यात नुकतेच काही दिवसांपूर्वी तालुकास्तरीय क्रीडा संमेलन तथा सांस्कृतिक महोत्सव सर्वत्र मोठ्या उत्साहात पार पडले.अशातच एकीकडे क्रीडा संमेलनाचा महोत्सव साजरा होत असतांना आठ शिक्षकांनी एका दारूच्या अड्ड्यावर बसून दारू ढोसून उत्सव साजरा केल्याचे जिल्ह्यात उघडकीस आल्याने शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली आहे.प्रकरणी ‘त्या’ आठही शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावून चौकशी समिती गठीत करून अहवाल मागविण्यात आल्याने कारवाईची टांगती तलवार निश्चित असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
अधिक माहिती अशी की,गडचिरोली जिल्ह्याच्या
एटापल्ली जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयात तालुकास्तरीय क्रीडा संमेलन व सांस्कृतिक महोत्सव २ ते ४ जानेवारीला पार पडत असतांना महोत्सवादरम्यान शिक्षकांनी गट्टा रोडवर असलेल्या एका दारूच्या गुत्त्यासमोर मद्यपान केले होते.हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला होता. दरम्यान,समाजमाध्यमावरदेखील फोटो व्हायरल झाले होते.सदर प्रकरणाची गंभीर दखल घेत शिक्षणाधिकारी बाबासाहेब पवार यांनी कारवाईचे निर्देश दिले असून आठ शिक्षकांना गटविकास अधिकारी डॉ.आदिनाथ आंदरे यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.यासंदर्भात चौकशी अहवाल मागविण्यात आला आहे.त्यानुसार ‘त्या’ आठ शिक्षकांवर कारवाई होण्याचे संकेत वर्तविण्यात येत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

हॉटेलचा नाश्ता महागणार; व्यवसायिक सिलेंडरच्या दरात सर्वात मोठी वाढ.. – सर्वसामान्यांच्याच खिशाला कात्री..

उद्रेक न्युज वृत्त :-महिन्याच्या सुरुवातीलाच कमर्शियल म्हणजेच व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.आज,शुक्रवार १ मे रोजी १९ किलोच्या व्यवसायिक सिलेंडरच्या किंमतीत...

उद्याला बारावीचा ऑनलाइन निकाल..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार,याची उत्सुकता असतांनाच राज्य बोर्डाने काल गुरुवारच्या रात्री परिपत्रक काढत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च...

महाराष्ट्र राज्याचा ६७ वा स्थापना दिन उत्साहात साजरा.. महाराष्ट्र दिनी “समृद्ध गडचिरोली” घडविण्याचा संकल्प..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांनी “समृद्ध गडचिरोली” घडवण्याचा संकल्प व्यक्त करत विकास, शांतता...

‘आदिशा’ प्रकल्पांतर्गत महिला बचत गटातील लाभार्थ्यांना मिळणार दोन टक्के व्याजदराने १ लाख रुपये..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महिला बचत गटांना केवळ २ टक्के व्याजदराने फिरता निधी उपलब्ध करून देत गावपातळीवर आर्थिक साखळी निर्माण करणारा ‘आदिशा’ प्रकल्प जिल्ह्याच्या विकासात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!