Wednesday, June 3, 2026
Homeगडचिरोली"त्यात"आमचा दोष काय? झाडीपट्टी लावणी गृपला परवानगी द्या....-झाडीपट्टी लावणी संघटनेतर्फे राज्याचे विरोधी...

“त्यात”आमचा दोष काय? झाडीपट्टी लावणी गृपला परवानगी द्या….-झाडीपट्टी लावणी संघटनेतर्फे राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वाडेट्टीवार यांना निवेदन सादर…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :-भंडारा जिल्ह्याच्या नाकाडोंगरी येथे मागील काही दिवसांपूर्वी डान्स हंगाम्याच्या नावाखाली अश्लील नृत्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता.त्यानुसार पोलीस प्रशासनाने दखल घेत आयोजकांवर गुन्हे दाखल केले होते.दुसऱ्यांनी केलेली करणी आमच्या माथी कां? आमचा दोष काय?अशी आपबिती राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वाडेट्टीवार यांना सांगत झाडीपट्टी लावणी गृपला परवानगी देण्यात यावी; अशा मागणीचे निवेदन   देसाईगंज झाडीपट्टी लावणी संघटनेतर्फे सादर करण्यात आले.

देसाईगंज झाडीपट्टी लावणी संघटनेने आज दिनांक- १० डिसेंबर रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले की,आम्ही लावणी गृपचे कलाकार सदस्य पोटाची खळगी भरण्यासाठी डान्सच्या माध्यमातून रसिकांचे मनोरंजन करून सांस्कृतिक कार्यक्रम सादर करीत असतो. सध्या स्थितीत झाडीपट्टी लावणी गृपला परवानगी दिली जात नाही.याचे मुख्य कारण म्हणजे,भंडारा जिल्ह्याच्या नाकाडोंगरी येथे काही दिवसांपूर्वी अश्लील नृत्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.मात्र त्यात आमचा कसलाही संबंध नाही.नाकाडोंगरी येथील प्रकारामुळे झाडीपट्टी लावणी ग्रुपला ब्रम्हपुरी तालुका,नागभीड तालुका तसेच इतरही तालुक्यात कार्यक्रमास परवानगी नाकारली जात असल्याने एका गृपमुळे सर्वच लावणी गृपला परवानगी नाकारणे हा आमच्यावरील अन्याय आहे.असा होत असलेला अन्याय दूर करावा व झाडीपट्टी लावणी गृपला कार्यक्रम करण्यास परवानगी मिळावी; यासाठी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वाडेट्टीवार यांना झाडीपट्टी लावणी संघटनेतर्फे निवेदन सादर करण्यात आले आहे.

निवेदन सादर करतेवेळी झाडीपट्टी लावणी संघटनेचे भुवनभाऊ लिल्हारे,मनीष मोटघरे,अमित पिपरे, विलास कावळे,अमोल जाधव,प्रज्वल मेश्राम,रमेश केसलापूरे,सम्यक वासनिक व इतर सदस्य उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

डिझेलचा टँकर पलटी होताच इंधन नेण्यासाठी लोकांची झुंबड..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-आधीच इंधन कमतरतेमुळे पेट्रोल पंपावर गर्दी होतांना दिसून येते.अश्यातच एखाद्या घटनेत चक्क इंधनाचा टँकर पलटी होऊन डिझेलचा महापूर होत असल्याची बाब...

तूर प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवरील ‘शेतकरी योजना’ या उपक्रमांतर्गत कडधान्य आत्मनिर्भरता अभियान सन २०२६-२७ अंतर्गत तूर प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ घेण्यासाठी...

गोदाम बांधकाम,तेल काढणी युनिट,कडधान्य प्रक्रिया व पॅकेजिंग युनिटसाठी लाखो रुपयांपर्यंत अनुदान.. – बना स्वतःच मालक; ऑफलाईन अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील भुईमूग,करडई,तीळ यांसारख्या तेलबिया पिकांचे तसेच तूर,हरभरा व इतर कडधान्यांचे उत्पादन वाढविण्यासोबतच त्यांचे मूल्यवर्धन आणि शेतकऱ्यांना अधिक आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी...

शाळेची पहिली घंटा वाजणार ‘या’ दिवशी..!

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील वाढती उष्णता लक्षात घेता यंदा शाळेची पहिली घंटा उशिरा सुरू होण्याच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला असून यंदा २०२६-२७ या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!