उद्रेक न्युज वृत्त
संपादक
गडचिरोली :- एकदा आमरण उपोषण झाले; परत पुन्हा दुसऱ्यांदा आमरण उपोषणाचा पावित्रा घेऊन भर पावसात पेंडाल बांधून दोन दिवस मच्छर व डासांच्या सानिध्यात ठान मांडून बसणाऱ्या आमरण उपोषण कर्त्याची हल्ली देसाईगंज उपवनसंरक्षक कार्यालयात ए सी एफ व गडचिरोलीसामाजिक वनीकरण विभागात अतिरिक्त पदभार असलेले विभागीय वन अधिकारी मनोज चव्हाण यांनी जणूकाही सर्व सामान्य नागरिकाला गण्या बनविण्याची शपथ घेतली की काय?असे हल्ली चित्र निदर्शनास येऊ लाग आहे.’तूम्ही आमरण उपोषण करा? नाहीतर मरून जा…याच्याशी काहीही देणे-घेणे नाही.आम्ही आमची बाजू सेफ ठेवू असे निदर्शनास येऊ लागल्याने आता कुठल्याही कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर कार्यवाही न करता वरिष्ठ असणाऱ्या चव्हाण यांच्यावर कारवाई करण्यात यावी; अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सत्यवान रामटेके यांनी केली आहे.
रामटेके यांच्या मतानुसार,वरिष्ठांच्या संमती शिवाय कनिष्ठ कुठलेही पाऊल उचलूच शकत नाही? जोपर्यंत मोठ्याचा आशीर्वाद मिळणार नाही; तोपर्यंत भम…भम.. भोले..असे चित्र कनिष्ठ गाजविणारच नाही.मोठ्याचा आशीर्वाद असणारे चित्र हल्ली देसाईगंज सामाजिक वनीकरण विभागा अंतर्गत येणाऱ्या कुरखेडा,आरमोरी,वडसा व कोरची येथील पूर्वी झालेल्या ३३ कोटी वृक्ष लागवड राज्य योजना व हल्ली सुरू असलेल्या वृक्ष लागवड योजनेमध्ये सुरू असल्याचे दिसून येत आहे.यामध्ये “दाल में कुछ काला नहीं” “तो पुरी दाल ही काली है”! असे प्रत्यक्ष भेटी दिलेल्या व वृक्ष लागवड करण्यात आलेल्या साइटवरून दिसून येत असतांनाही महाशय म्हणतो की, करू..आपण चौकशी करू?..मात्र जिंकू किंवा मरू…याला त्याचे काहीही देणे-घेणे नाही..! ‘तुम्ही कितीही आमरण उपोषण करा..! मी गण्या बनविणारच…. व मी फक्त कागदाचे घोडे नाचविणारच…! मात्र समोरच्या व्यक्तीस कधीही कमजोर,तुच्छ वा चोलर समजू नये; प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने बरोबर असतो.समोरील व्यक्ती कधी ‘बँडबाजा बारात’ घेऊन निघणार हे सांगता येणार नसल्याने ‘ये ना चल बे..’ कित्तेक वृक्ष लागवडीच्या साईटवर लागवडीचे फलक नाही,काही अंतरावर वृक्ष नाही,बोगस मजुर,जिवंत रोपांची टक्केवरी जास्त दाखवून सर्व माल डब्ब्यामद्ये व इतर असा बराचसा झांगड गुत्ता करून वृक्ष लागवडीच्या कामांमध्ये किती मोठा भ्रष्टाचार करण्यात आला व हल्ली किती सुरू आहे; याचे आकडेच सांगणे अवघड झाले आहे.तरीही ‘झाकली मुठ लाखमोलाची’असे करून ‘तो मी नव्हेच’ अशी भूमिका वरिष्ठांकडून बजावली जात असल्याने ‘एक दिवस कुणाच्या तरी घरावर गोटे येणार’ ;असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.यासाठी पुढील घंटा ही धोक्याचीच म्हणावी लागेल.कारण शासन स्तरावरून कधीही म्हटले जात नाही की तुम्ही कसेही काम करा वा कितीही चुना लावा.चुना लावणाराच कचाट्यात येत असतो.
पुढील वृत….रोखठोक