Wednesday, August 19, 2026
Homeगोंदिया'तुझ्या मुलीला मी मागणार आहे; तर तू पाहुणे कशाला बोलावतोस' असे म्हणीत...

‘तुझ्या मुलीला मी मागणार आहे; तर तू पाहुणे कशाला बोलावतोस’ असे म्हणीत प्रियकराने घातला धिंगाणा..! – प्रियकराने मुलीचे घर गाठत मुलीच्या वडिलांना झोडपले…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

गोंदिया :-आजच्या आधुनिक काळात प्रेमाची रूपरेषा बदलल्याने प्रेम ‘खरे की खोटे’ हेच कळेनासे झाले आहे.काहीजण प्रेमाकडे नुसता टाईमपास म्हणून बघतात तर काहीजण जीवापाड प्रेम करून प्रेमासाठी वाट्टेल ते भूमिका घेतांना दिसून येतात.परंतु,काहीजण आपले प्रेम जग जाहीर करायचे नाही; अशीही भूमिका घेत असतात.अशातच ‘ती माझी आहे; माझी नाही तर कुणाचीही नाही’ अशी काही तरुणांची भूमिका असते.त्यामुळे काही तरुण तिचे दुसऱ्याशी लग्न होऊ नये; यासाठी लग्नासाठी येणाऱ्या स्थळाकडे करडी नजर ठेवून असतात.असाच प्रकार गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील लोहारा येथे घडला.मुलीला पाहायला एक स्थळ आले.परंतु, आलेल्या पाहुण्यांच्या समोरच प्रियकराने मुलीचे घर गाठले.पाहुण्यांच्या समोरच त्याने गोंधळ घालत मुलीच्या वडिलांना झोडपले असल्याची घटना चार दिवसांपूर्वी म्हणजेच शुक्रवारी १३ डिसेंबरला दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली.

देवरी तालुक्याच्या लोहारा येथील मनोज नानूलाल गौतम वय २५ वर्षे याचे गावातीलच एका मुलीवर प्रेम आहे.तो लग्नासाठी तिच्या वडिलांकडे वांरवार मागणी घालत होता.परंतु,मुलीच्या वडिलांनी मुलीचे लग्न जुळविण्यासाठी बाहेरील एक स्थळ बोलावले.मुलीला पाहण्याचा कार्यक्रम शुक्रवार १३ डिसेंबर रोजी ठरला.दुपारी २:३० वाजताच्या सुमारास मुलीला पाहायला आलेल्या पाहुण्यांचा मानसन्मान सुरू असतांनाच अचानक तिच्या प्रियकराने तिचे घर गाठून पाहुण्यांच्या समोरच मुलीच्या वडिलांना शिवीगाळ करणे सुरू केले. ‘तुझ्या मुलीला मी मागणार आहे; तर तू पाहुणे कशाला बोलावतोस’ असे म्हणीत त्याने मुलीच्या वडिलांना शिवीगाळ करीत थापडबुक्क्यांनी झोडपले व पुढे ठार मारण्याचीही धमकी दिली.
या घटनेसंदर्भात मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून आरोपी मनोज नानूलाल गौतम वय २५ वर्षे,रा. लोहारा याच्यावर सालेकसा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३२९ (४),२९६,११५ (२),३५१ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंज एमएसडब्ल्यूच्या विद्यार्थ्यांना विविध संस्था भेटीतून सामाजिक कार्याचे मोलाचे मार्गदर्शन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज अनिकेत समाजकार्य महाविद्यालयाच्या वतीने नुकतेच एम.एस.डब्ल्यू.(समाजकार्य पदव्युत्तर पदवी) अभ्यासक्रमाच्या १२० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांसाठी विविध सामाजिक संस्थांना संस्था भेटीचे आयोजन करण्यात आले.या भेटीदरम्यान...

विजेचा जोरदार शॉक; दोन भावांचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त पुणे :-घराजवळ असणाऱ्या जनावरांच्या गोठ्याजवळ विजेचा जोरदार शॉक लागून दोन सख्ख्या चुलत भावांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज,बुधवार १९ ऑगस्ट रोजी सकाळी...

खुद्द पत्नीनेच प्रियकर दिराच्या मदतीने पतीचा काढला काटा.. -अनैतिक संबंधाचा बिन भाड्याच्या खोलीत ‘दी एंड’..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-अनैतिक संबंधात आडकाठी येणाऱ्या पतीचा खुद्द पत्नीनेच प्रियकर चुलत दिराच्या मदतीने काटा काढल्याची घटना वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट तालुक्यातील वडनेर पोलिस ठाण्याच्या...

विद्यमान आमदारांच्या पीए व वाहनचालकांच्या मानधनात वाढ..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्याच्या विधानसभा आणि विधान परिषदेच्या विद्यमान आमदारांचे स्वीय सहाय्यक म्हणजेच पीए आणि वाहनचालकांच्या मानधनात दहा हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे.सदरची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!