Saturday, August 8, 2026
Homeमूलतालुका कृषी अधिकाऱ्याच्या विरोधात महिला कर्मचाऱ्याने केली विनयभंगाची तक्रार…- कृषी अधिकाऱ्याच्या पत्नीला ही...

तालुका कृषी अधिकाऱ्याच्या विरोधात महिला कर्मचाऱ्याने केली विनयभंगाची तक्रार…- कृषी अधिकाऱ्याच्या पत्नीला ही लिहिले होते पत्र

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

मूल(चंद्रपूर) :- मूल तालुका कृषी अधिकाऱ्याच्या विचित्र वागणुकीला कंटाळून त्याच कार्यालयातील महिला कर्मचाऱ्याने पोलिस स्टेशनला विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे.महिलेच्या तक्रारीवरून मूल पोलिस स्टेशन येथे शुक्रवारी रात्री १०:२० वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्रशांत गोविंदा कासराळे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कृषी अधिकाऱ्याचे नाव आहे.विशेष म्हणजे,वरिष्ठांकडे तक्रार करूनही दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

काही वर्षांपासून प्रशांत कासराळे तालुका कृषी अधिकारी म्हणून कार्यरत आहे.मागील काही महिन्यांपासून वाईट नजरेने बघत जाणून-बुजून स्पर्श करणे,सुटीच्या दिवशी एकटीलाच कार्यालयात बोलविणे,असे प्रकार करीत असल्याचे तसेच २६ मार्चला दुपारी २ वाजेच्या सुमारास रंगपंचमी असल्याने जोरजबरजस्तीने डोक्यावर अंडे फोडून अश्लील हावभाव केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

कृषी अधिकाऱ्यांच्या अशा विचित्र वागणुकीमुळे त्रासलेल्या महिला कर्मचाऱ्याने जिल्ह्यातील वरिष्ठ कार्यालयाकडे तक्रार दाखल केली.मात्र,वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे.अखेर मूल पोलिस स्टेशनला १७ मे रोजी तक्रार दाखल करण्यात आली.तक्रारीच्या आधारे मूल पोलिस स्टेशन येथे कलम ३५४, ३५४(अ) भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मूलचे उपविभागीय पोलिस अधिकारी एस.एस.भगत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुमित परतेकी करीत आहेत.

कृषी अधिकाऱ्याच्या पत्नीला पत्र👇

आपल्यावरील अन्यायाबाबत तसेच तिच्या पतीचे कारनामे माहिती व्हावे आणि आपली त्रासापासून सुटका व्हावी; यासाठी फिर्यादी महिलेने कृषी अधिकाऱ्याच्या पत्नीला पत्र पाठवून माहिती दिली.

या पत्रानंतरही त्या अधिकाऱ्याच्या वागण्यामध्ये कुठेही बदल झाला नाही.त्यानंतर मात्र,त्रस्त झालेल्या महिला कर्मचाऱ्याने थेट पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केल्याचे कळते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शिक्षण सेवक व शिक्षक पदभरती प्रक्रियेस सुरुवात; राज्यात ३० हजार २०९ रिक्त पदांची भरती..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये 'पवित्र पोर्टल'द्वारे शिक्षण सेवक आणि शिक्षक पदभरतीची कार्यवाही सुरू करण्यात आली...

गडचिरोली जिल्ह्यात अग्निवीर भरतीसाठी तब्बल सहा ठिकाणी मार्गदर्शन मेळावे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारतीय सैन्यातील अग्निवीर भरती प्रक्रियेबाबत जिल्ह्यातील इच्छुक युवक-युवतींना सविस्तर माहिती व मार्गदर्शन मिळावे,यासाठी गडचिरोली जिल्ह्यात येत्या,सोमवार १० ते १२ ऑगस्ट २०२६...

सात हजाराची लाच भोवली; महिला ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यात भंडारा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत तब्बल सात हजाराची लाच घेतांना एका महिला ग्रामसेविकेस रंगेहाथ पकडले.रंजू...

राज्यातील ६ लाख २२ हजार शेतकऱ्यांना ५ हजार २९ कोटींच्या कर्जमुक्ती लाभाचे वितरण.. – आज गडचिरोली जिल्ह्यातील २ हजार ६७१ पात्र शेतकऱ्यांसाठी बँकांना रक्कम...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :- 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील २ हजार ६७१ पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांसाठी १५ कोटी १८ लाख ७२ हजार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!