Saturday, July 25, 2026
Homeगोंदिया'डायल ११२' वर खोटी माहिती देत असाल तर सावधान; कारावासासह दंडाची शिक्षा.....

‘डायल ११२’ वर खोटी माहिती देत असाल तर सावधान; कारावासासह दंडाची शिक्षा.. – खोटी माहिती दिल्याने तरुणावर गुन्हा दाखल..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :- ‘डायल ११२’ हा भारत सरकारचा आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांक आहे.याद्वारे आपत्कालीन परिस्थितीत पोलिस व इतर काही महत्त्वाच्या सेवा एकाच नंबरवर जलद गतीने मिळतात. ११२ हा क्रमांक २४ तास सुरू असतो.कॉल केल्यावर काही वेळातच घटनास्थळी मदत पोहोचवली जाते.११२ नंबर डायल केल्यावर नियंत्रण कक्षाला तुमच्या फोनचे अचूक जीपीएस(GPS)लोकेशन कळते,ज्यामुळे मदत पाठवणे सोपे होते.सदरचा कॉल मोबाईल फोन वा लँडलाईनवरून. मोफत करता येतो.पण, ‘डायल ११२’ या आपत्कालीन क्रमांकावर खोटी किंवा दिशाभूल करणारी माहिती दिल्यास थेट कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल केला जातो,ज्यामध्ये दोषी व्यक्तीला एक वर्षाचा कारावास वा १० हजार रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.मात्र,काहींना याबाबत माहिती नसल्याने एखादी मस्करी करण्यासाठी वा जाणून- बुजून त्रास देण्यासाठी ‘डायल ११२’ वर खोटी व दिशाभूल करणारी माहिती देण्यात येते.अश्याच प्रकारे गोंदिया जिल्ह्याच्या नवेगावबांध येथील एका ३६ वर्षीय तरुणाने ‘डायल ११२’ वर फोन करून एकाचा खून झाल्याची माहिती दिली.मात्र,प्रत्यक्षात अशी कुठलीही घटना घडलेली नसल्याचे निष्पन्न झाल्याने अखेर तरुणावर नवेगावबांध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदकुमार शामराव उईके वय ३६ वर्षे,रा.माऊली मोहल्ला, नवेगावबांध, ता.अर्जुनी मोरगाव,जि.गोंदिया असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.
तीन दिवसांपूर्वी रात्री ८ वाजून २० मिनिटांनी नवेगावबांध पोलिस ठाण्याच्या हद्दीत ‘डायल ११२’ वर एका व्यक्तीने ‘खून झालाय,लवकर या.!’ अशी माहिती दिली.देण्यात आलेली माहिती अत्यंत गंभीर स्वरूपाची असल्याने नवेगावबांध पोलिस ठाण्याचे अधिकारी व पोलिसांचा मोठा फौजफाटा घेऊन तातडीने घटनास्थळी रवाना झाले.मात्र,घटनास्थळी पोहचताच अशी कोणतीही खुनाची घटना घडलेली नसल्याचे स्पष्ट झाले.त्यानंतर करण्यात आलेल्या चौकशीत संबंधित व्यक्तीने केवळ मस्करी करण्यासाठी खोटी माहिती दिल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.विशेष म्हणजे,खोट्या कॉल्समुळे पोलिसांचा मौल्यवान वेळ आणि आपत्कालीन संसाधने वाया जातात,ज्यामुळे खऱ्या गरजू लोकांपर्यंत मदत पोहोचण्यास अडथळा निर्माण होतो.या घटनेमुळे आपत्कालीन सेवेचा गैरवापर करणाऱ्यांवर पोलीस प्रशासनाने कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नशामुक्त युवा विकसित भारत’ अभियानांतर्गत जिल्हास्तरीय विविध स्पर्धांचे आयोजन.. – विजेत्या स्पर्धकांना जिल्हास्तरीय पारितोषिकांसह राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या मेरा युवा भारत(MY Bharat) उपक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या "नशामुक्त युवा विकसित भारत" या राष्ट्रव्यापी अभियानाच्या...

गडचिरोली जिल्ह्यात तिरंदाजी खेळाचे प्रशिक्षण केंद्र; आष्टी येथे खेळाडू निवड चाचणीचे आयोजन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-केंद्र शासनाच्या क्रीडा मंत्रालयामार्फत खेलो इंडिया आर्चरी प्रशिक्षण केंद्र(आष्टी)अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात आर्चरी(तिरंदाजी)खेळाचे प्रशिक्षण केंद्र मंजूर करण्यात आले आहे.या केंद्रात ३० प्रशिक्षणार्थी...

लाडक्या बहिणींची अंतिम लाभार्थी यादी जाहीर; ८० लाखाहून अधिकच्या महिलांचे दीड हजार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :- 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेची अंतिम लाभार्थी यादी निश्चित करण्यात आली असून राज्यातील १ कोटी ६६ लाख २८ हजार ४८ महिला योजनेसाठी...

दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा होणार गौरव; राष्ट्रीय पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती,दिव्यांग व्यक्ती व संस्थांचा गौरव करण्यासाठी भारत सरकारच्या दिव्यांगजन सशक्तीकरण विभागामार्फत दरवर्षी ३ डिसेंबर रोजी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!