- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-कोरचीचे तहसीलदार प्रशांत गड्डम हे कार्यालयातील महसूल कर्मचारी व नायब तहसीलदार यांना मानसिक त्रास देत अश्लील भाषेचा वापर करून कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करतात.याबाबत महसूल कर्मचारी संघटनेने १४ ऑक्टोंबरला जिल्हाधिकारी संजय दैने यांना निवेदन सादर करीत आंदोलनाचा इशारा दिला होता.अशातच आणखी एका प्रकरणात कोरचीचे तहसीलदार वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. तहसीलदारांशी संबंधित आणखी एक प्रकरण समोर आले आहे.जप्त ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी तहसीलदारांच्या खासगी वाहनचालकाकडून ३० हजार रुपये घेतल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने पुन्हा एकदा कोरची तहसील कार्यालय चर्चेत आले आहे.
कोरचीचे तहसीलदार प्रशांत गड्डम हे गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. अवघ्या ११ महिन्यांच्या कालावधीत बदली झाल्यानंतर त्यांनी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे पत्र घेऊन आपली बदली थांबवली होती.दरम्यान, तहसीलदार मनमानी कारभार करत असून त्यांच्या अधिनस्थ कर्मचाऱ्यांना त्रास देत असल्याबाबत महसूल कर्मचारी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.आता तहसीलदारांशी संबंधित आणखी एक प्रकरण समोर आले आहे.
काही दिवसांपूर्वी तहसीलदार प्रशांत गड्डम यांनी काही ट्रॅक्टरवर कारवाई केली होती.परंतु संबंधित ट्रॅक्टरवर कोणतीही कारवाई करणार नाही; असे सांगून तहसीलदारांचे वैयक्तिक चालक अजय ताराम यांनी ट्रॅक्टर चालकाकडे पैशांची मागणी केली.ताराम यांनी ट्रॅक्टर चालकाकडून ३० हजार रुपये घेतल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.त्यामुळे या प्रकरणाची कोरची तालुक्यासह जिल्हाभरात चर्चा सुरु आहे.
प्रशांत गड्डम,तहसीलदार,कोरची👇
माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही.कोणाचेही नाव घेऊन कोणीही पैसे मागू शकतो; याचा अर्थ संबंधित व्यक्ती या प्रकरणाशी जोडले आहे असे होत नाही.जप्त केलेले ट्रॅक्टर सोडण्याचा अधिकार तहसीलदारांना नसून उपविभागीय अधिकाऱ्यांना आहे.या प्रकरणाची चौकशी करून अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात येणार आहे.
- Advertisement -

