Thursday, October 8, 2026
Homeनागपूरज्या लोकप्रतिनिधींच्या हातात राजकारणाची दोरी; तेच पदवीधर मतदारसंघाच्या मतदानापासून राहणार दूर.. -...

ज्या लोकप्रतिनिधींच्या हातात राजकारणाची दोरी; तेच पदवीधर मतदारसंघाच्या मतदानापासून राहणार दूर.. – १४ आमदार आणि दोन खासदार यांचे शिक्षण पदवीपेक्षा कमी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-सध्या महाराष्ट्र विधानपरिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे.उद्या,शुक्रवार ९ ऑक्टोंबरला अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असून २३ ऑक्टोंबर रोजी मतदान,तर मतमोजणी व निकाल २७ ऑक्टोंबर २०२६ रोजी लागणार आहे.अश्यातच ज्या लोकप्रतिनिधींच्या हातात राजकारणाची दोरी आहे; अश्या राजकारणी लोकप्रतिनिधिंच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतदारासाठीची शैक्षणिक अर्हताच नसल्याने त्यांना बाहेरूनच निवडणुकीचा व प्रत्यक्ष प्रचाराचा आनंद घेत उमेदवाराच्या विजयासाठी प्रयत्न करावे लागणार आहे. यात नागपूर विभाग पदवीधर निवडणुकीसाठी भाजपकडून निवडणूक प्रभारी असलेले चंद्रशेखर बावनकुळे,निवडणूक प्रमुख प्रवीण दटके,काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार व नाना पटोले,तर राष्ट्रवादी काँग्रेसचे
धर्मरावबाबा आत्राम यासारख्यांना मतदानापासून वंचित राहावे लागणार आहे.मतदार नसलेल्यांच्या यादीत विभागातील १४ आमदार व २ खासदारांमध्ये सर्वाधिक भाजपच्या १० आमदारांचा समावेश आहे.तर प्रत्येकी एक खासदार भाजप व काँग्रेसचा आहे.पदवीधर निवडणुकीसाठी मतदार नोंदणीसाठी किमान पदवीधर ही शैक्षणिक अर्हता आहे.मात्र,जे या निवडणुकीसाठी प्रचाराची व व्युहरचनेची धुरा सांभाळत आहेत तेच नेते व लोकप्रतिनिधी मतदार नाहीत,ही एकप्रकारची शोकांतिकाच म्हणावी लागेल.विशेष म्हणजे,पदवीधर मतदारसंघाच्या नियमानुसार,मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी संबंधित व्यक्ती पदवीधर(ग्रॅज्युएट) असणे अनिवार्य असते.पण,नागपूर विभागातील ३२ पैकी १४ आमदार आणि दोन खासदार यांचे शिक्षण पदवीपेक्षा कमी म्हणजेच काहींचे दहावी,बारावी वा कॉलेजचे पहिले-दुसरे वर्ष असल्यामुळे त्यांना या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता येणार नाही.
  • १४ आमदार आणि दोन खासदार यांचे शिक्षण पदवीपेक्षा कमी👇
  • नागपूर जिल्हा-कृष्णा खोपडे (७ वी), चरणसिंह ठाकूर(१२ वी),मोहन मते (आयटीआय),प्रवीण दटके(डिप्लोमा प्रथम वर्ष),चंद्रशेखर बावनकुळे(बीएससी प्रथम वर्ष)
  • चंद्रपूर जिल्हा-विजय वडेट्टीवार(१० वी), किशोर जोरगेवार(१० वी)
  • भंडारा जिल्हा-राजू कारेमोरे(१२ वी),नाना पटोले(बीए द्वितीय वर्ष)
  • गोंदिया जिल्हा-विनोद अग्रवाल(१२ वी), संजय पुराम(१२ वी)
  • गडचिरोली जिल्हा-धर्मरावबाबा आत्राम(१० वी)
  • वर्धा जिल्हा-समीर कुणावार(१२ वी),राजेश बकाने(बीए प्रथम वर्ष)
  • खासदार-श्यामकुमार बर्वे(बीए द्वितीय वर्ष), माया इवनाते(५ वी)
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अनियमितता भोवली; कुरखेडा तालुक्याच्या पुराडा ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक निलंबित..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-ग्रामपंचायतीला प्राप्त होणाऱ्या विविध विकास कामांच्या निधीत तसेच अर्थसंकल्पीय तरतूदी शिवाय नियमबाह्य जादादर लावून खर्च करणे,खरेदी केलेल्या साहित्यांच्या नोंदी साठापंजीला न घेणे,विविध...

रब्बी हंगामासाठी प्रमाणित बियाणे व पीक प्रात्यक्षिकांना अनुदान; शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सन २०२६-२७ च्या रब्बी हंगामात पिकांची उत्पादकता वाढविणे आणि सुधारित व संकरित वाणांच्या प्रमाणित बियाण्यांचा वापर वाढविण्यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि...

सिने सृष्टीवर शोककळा; ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन.. – ज्येष्ठ अभिनेते आणि माझे निकटचे मित्र नाना पाटेकर यांची अशी अकाली आणि अचानक ‘एक्झिट’...

उद्रेक न्युज वृत्त :-ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे आज,गुरुवार ८ ऑक्टोंबर रोजी पहाटेच्या सुमारास वयाच्या ७५ व्या वर्षी गोव्यात निधन झाले.गोव्यातील डोना पौला येथील...

महाराष्ट्रातील गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत केंद्र सरकारकडून विशेष मदतीची मागणी; मुख्यमंत्र्यांनी घेतली अमित शाह यांची भेट..

उद्रेक न्युज वृत्त  नवी दिल्ली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यात आज,बुधवार ७ ऑक्टोंबरला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.या भेटीत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!