उद्रेक न्युज वृत्त
मुख्य संपादक/सत्यवान रामटेके
गडचिरोली :- जिल्ह्याच्याएटापल्ली तालुक्यातील जारावंडी नदी घाटातून अवैध रेती उत्खनन करून पेंढरी मार्गे छत्तीसगढ राज्यात ट्रक,ट्रॅक्टर व इतर साधनांद्वारे रेतीचा पुरवठा मोठ्या प्रमाणावर केला जात असूनही महसूल विभाग दिसून न दिसल्यासारखे करीत असल्याने एवढे निद्रावस्थेत कां? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सविस्तर वृत्त असे की,एटापल्ली तालुक्यातील जारावंडी जवळच बांदे नदिघाट लागून आहे.सध्याच्या घडीला रेती घाटांचे लिलाव झाले नसल्याने अवैध रेती उपसा सगळीकडेच मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे.अशातच काही तथाकथित जारावंडी येथील रेती तस्कर छत्तीसगढ राज्याच्या पाकांजुर येथील कंत्राटदारांशी हात मिळवणी करून अवैध रेती उपसा केलेली रेतीची विक्री करून शासनास लाखो रुपयांचा चुना लावतांना निदर्शनास येऊ लागले आहे.सदरची चोरी केलेली रेती ही रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत सुसाट वेगाने परप्रातांत सर्रास व राजरोसपणे जाऊ लागल्याने सदर साज्याचे मंडळ अधिकारी व तलाठी यांना कसलीही याबाबत जाणीव नसणे; ही नवलाची बाब आहे.त्यामुळे ‘तुम्ही माटवा आम्ही सांभाळू’ असे तर होत नसावे ना? बांदे नदिपात्रात मोठ मोठे खड्डे पडले असुन एवढे डोळेझाक करणे म्हणजे पाणी कुठेतरी मुरले जात असावे; अन्यथा पाणी मुरण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.ही साधी आणि सरळ मनधरणा वा ‘समजणे वाले को; खाली इशाराही काफी है’ सदर अवैध रेती वाहतुकीला मंडळ अधिकारी व तलाटी यांचा आर्शीवाद असल्याचे बोलल्या जात आहे.जारावंडी जवळ बांदे नदि आहे.या नदितिल रेती उत्खनन करून राजरोसपणे छतीसगडकडे रात्रौ वेळेस जात असुन हा मातंबर ठेकेदार पाकांजुर येथील असुन त्याचा सरकारी हा जारावंडी येथे राहात असल्याचे कळते.बांदे नदिपात्रात मोठ मोठे खड्डे पडले असुन रात्रोच्या वेळी अवैध रेतीची वाहतुक होत असल्याचे पेंढरी गावात बोलल्पा जात आहे. एवढी मोठी वाहतुक राजरोसपणे होत असतांना मंडळ आधिकारी व तलाटी डोळे मिटून बघत आहेत. तहसिदार एटापल्ली यांनी लक्ष देऊन अवैध रेती चोरीला आळा बसवावा अशी मागणी होत आहे.अवैध रेतीचा उपसा करून त्यातील पुरवठा परप्रातांत केला जातोय ही साधी बाब नसून यावर त्वरित आळा घालणे आवश्यक आहे.अन्यथा ‘चोरी तर चोरी वर शिनाजोरी तसेच त्यांचीच मुजोरी’ गावकऱ्यांना सहन करावी लागणार हे तितकेच सत्य आहे.