उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली : – महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने महिला दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.पुरातन काळापासुनच स्त्रीला अनन्य साधारण महत्व असुन स्त्री ही अनंत काळाची माता आहे असे संबोधीले जाते.या उक्तीस अनुसरुन ८ मार्च हा दिवस जागतीक महिला दिन म्हणुन राज्यात सर्वत्र साजरा केला जातो.सदर महिला दिनाचे औचित्य साधुन शालेय मुली,महाविद्यालयीन युवती व सर्व महिलांध्ये तंदुरुस्ती व आरोग्य या बाबत जागृकता निर्माण करण्याकरीता मुलींना अधिकाअधिक क्रीडा विषयक सोई सुविधा,मोकळे वातावरण,कौशल्याची संधी,मुलींच्या आरोग्य न्युट्रेशन,योग्य सवयी उपलब्ध करुन दिल्यास स्त्रीयांची पर्यायाने कुटुंबाची सुधारणा होऊन सशक्त समाज उभा राहील.
केंद्र शासनाच्या २० फेब्रुवारी २०२३ च्या मार्गदर्शक सुचनेनुसार ८ मार्च या दिवसाचे औचित्य साधून जिल्हास्तरावर शालेय व महाविद्यालयीन युवती व महिला करीता १० मार्च ते २५ मार्च २०२३
या कालावधीत १०० व २०० मीटर धावणे,कबड्डी, खो-खो,व्हॉलीबॉल,बॅडमिंटन,बॉक्सिंग,टेबल-टेनिस, सुर्यनमस्कार,स्वसंरक्षण दावपेच इत्यादी मनोरंजनात्मक खेळाचे आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाद्वारे आयोजीत करण्यात येणार आहे.याकरीता शालेय व महाविद्यालयीन युवती व महिला यांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे तसेच सहभागी होणाऱ्या संघांनी, युवक,युवतींनी, महिलांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे सकाळी १० वाजेपर्यंत आपल्या सहभागाबाबतची नोंद निश्चित करुन घेण्यात यावी.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत आज ८ मार्च रोजी दुपारी ४ वाजता महिला दिना निमीत्य जिल्हा क्रीडा संकुल,क्रीडा व सांस्कृतीक भवन,कॉम्पलेक्स गडचिरोली येथे साजरा करण्यात येणार आहे.याप्रसंगी क्रीडा क्षेत्रात व इतर विविध क्षेत्रात उत्तम कागगिरी केलेल्या महिलांचा सत्कार करण्यात येणार असून याप्रसंगी सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिलांनी,युवक-युवतींनी उपस्थित राहावे; असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गडचिरोली प्रशांत दोंदल यांनी केले आहे.