उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- मुलचेरा तालुक्यातील गोमणी गावा नजिक असलेल्या कोळीगांव येथील छोट्या नदि पुला समोरील अतीदुर्गम भागात मृद व जलसंधारण विभाग गडचिरोलीच्या यांच्या मार्फतीने पाच करोड रुपयाच्या अनुदानातून पेसा कायद्या अंर्तगत बंधार्याचे बांधकाम हल्ली सुरु आहे.सदर बांधकामात जवळच असलेल्या नाल्यातील अवैध रेतीचा उपसा सुरु असुन नाल्याच्या अवती-भोवती असणाऱ्या झाडांची अवैधरित्या वृक्षतोड झालेली असल्याने संबंधित विभाग एवढे गप्प कां? असा सवाल नागरिकांकडून केला जातो आहे.

सध्याच्या घडीला शासनाने रेती घाटांचा कोणत्याच प्रकारचा लिलाव झाला नसतांना एवढ्या मोठ्या प्रमाणात रेती येतो कुठून? याचा शोध मुलचेरा तहसिलदारांनी घ्यायची गरज आहे.सदर कामावर आंध्राचा ठेकेदार राजरोसपणे काम करीत आहे.परंतु पेसा अंतर्गत कामाची पाहणी ग्रामसेवक ग्रामपंचायत गोमणी,अवैध वृक्षतोड वनपाल गोमणी व तलाठी साजा गोमणी यांची देखरेख असतांना सुद्धा सदर कामाकडे दुर्लक्ष केल्या जात आहे.गावकऱ्यांच्या तक्रारीवरून रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्चर बोरकर यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता आंध्राच्या ठेकेदारास अवैध रेती उपस्या बाबत विचारपुस केली असता त्यांनी उडवाउडवीची उतर दिली.सदर जवळील नाल्यातूनच रेतीचा उपसा सुरु असल्याचे प्रत्यक्ष दर्शीनी दिसून होते.गोमणी वनविभागाच्या वनरक्षक धोंडा यांना सदर कामावरील अवैध वृक्षतोड बाबत बोरकर यांनी फोनवरून विचारणा केली असता,त्यांनीही उडवाउडवीची उतर दिली तर ग्रामसेवक वेलादी ग्रामपंचायत गोमणी यांना फोन करून विचारले असता त्यांनीही टाळाटाळ केली.तलाटी साजा गोमणी यांचा फोन बंद होता.सदर कामात अवैध रेतीमुळे शासनाचा करोडो रुपयाचा महसुल बुडण्याची दाट शक्यता आहे. तहसिलदार मुलचेरा व वनविभाग वन परिक्षेत्र अधिकारी यांनी वेळीच लक्ष देण्याची गरज आहे.कोळीगांव नाला बंधारा बांधकामांमुळे फक्त जनावरांना पिण्याच्या पाण्याची सोय होवू शकते व वरील भागात थोडी शेती आहे.शेतकऱ्यांना सिंचनाची सोय होवू शकते.

सर्व आजुबाजुला जंगल परिसर आहे.यातही याच बंधार्याच्या वर दोनशे पाऊलवार यापूर्वीच बंधारा बांधला गेला असून त्याच बंधाऱ्यांची अवस्था जिर्ण अवस्थेत असतांना मृद व जलसंधारण विभागाने पुन्हा काही अंतरावर त्याच ठिकाणी बंधारा बांधकाम करीत असल्याने आश्यर्य व्यक्त केले जात आहे.ग्रामसेवक, तलाठी व वनरक्षक यांनी सदर बंधाऱ्याची वेळीच पाहणी करून अवैध रेती उपसा व अवैध वृक्षतोड याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.नाहीतर माहीत असूनही माहीत नसल्याचे भासवणे म्हणजे ‘हमको क्या मालूम’ असे व्हायला नको.