- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मागील काही दिवसात चोरी-छूपे सुरु असलेले अवैध व्यवसाय अलीकडच्या काळात राजरोजसपणे सुरु झाले आहेत.त्यामुळे प्रतिबंधित गुटखा विक्री तसेच इतर अवैध व्यवसायाच्या आहारी गेलेल्या सर्वसामान्य नागरिकांची प्रचंड लुट सुरु आहे.अवैध व्यवसायांनी डोकेवर काढल्याने तरुणाई व्यसनांच्या विळख्यात फसत असून अनेक कुटुंब उद्धवस्त होत आहेत. जिल्ह्यातील अवैध व्यवसायांकडे पोलीस प्रशासनाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याची चर्चा असून सामान्य नागरिक चांगलाच धास्तावले आहे.पोलिसांकडून कारवाई केली जात असली तरी अवैध धंद्यांना उधाण आला आहे.यामुळे पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील गावखेड्यात सर्वत्र राजरोसपणे अवैध प्रवासी वाहतूक,अवैध गुटखा विक्री,गावठी दारु,बनावट देशी व विदेशी दारुचा पुरवठा व अवैध विक्री राजरोसपणे सुरू आहे. परिणामी,तरुणवर्ग वाममार्गाला लागत असल्याने कुटुंबातील वयोवृध्दांना चिंतेने ग्रासले आहे.सतत तीन वर्षांपासून नापिकीचा फटका बसत असल्याने अडचणीत असलेल्या शेतकरी कुटुंबांनी न्याय मागावा तरी कुणाकडे अशी परिस्थिती होऊन बसली आहे. जिल्हा पोलिस तसेच तालुका पोलिसांकडून अवैध धंद्यांना आवर घातला जाईल,अशी अपेक्षा जिल्हावासियांची होती.सुरुवातीचे काही दिवस गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर वचक निर्माण करुन काही प्रमाणात अवैध धंदे बंद केल्याने जिल्ह्याला ‘अच्छे दिन’ मिळाल्याची भावना बळावली होती.मात्र,अच्छे दिन,बुरे दिन कधी व कां झाले? याचे कोडे अजूनही कुणालाही उलगडले नाही.त्यामुळे जिल्ह्यातील अवैध व्यवसायांना आवर घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेण्याची गरज निर्माण झाली आहे. अवैध प्रवासी वाहतूक चिरीमिरी घेऊन चालू असल्याचे चित्र असून अवैध धंद्यामुळे युवापिढी उद्धवस्त होत असल्याचे विदारक चित्र पहावयास मिळत आहे.निवडणुकीच्या काळात अनेक अवैध व्यवसायांवर कारवाई करण्यात आली.मात्र,त्यानंतर परत सदर अवैध धंदे सुरू झाले आहे.यामुळे पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
तालुका मुख्यालयासह ग्रामीण भागात प्रतिबंधित गुटख्याची साठवणूक केल्या जाते.येथून छोट्या मोठ्या वाहनांव्दारे हा गुटखा शहरातील पानटपऱ्या, गावखेडी तसेच जिल्ह्यात इतरत्र पुरविला जातो.याची माहिती पोलीस प्रशासनातील अधिकारी,कर्मचाऱ्यांना नाही; असे म्हणणे अतिशययोक्ती ठरणार नाही.अवैध गुटखा विक्रीतून गब्बर झालेल्या वा गुटखा माफीयांच्या मुसक्या आवळण्यासाठी प्रशासन कोणत्या मुहूर्ताची वाट बघत आहे; असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
- Advertisement -