Tuesday, September 8, 2026
Homeगडचिरोलीचंद्रपूर जिल्ह्यातील तरुणाचा गडचिरोली जिल्ह्यात खून..

चंद्रपूर जिल्ह्यातील तरुणाचा गडचिरोली जिल्ह्यात खून..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातून एक खळबळ उडवणारी घटना उघडकीस आली आहे.  एका ३४ वर्षीय तरुणाच्या डोक्यात अज्ञाताने तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या केल्याची घटना काल सोमवारच्या रात्री दहा वाजेच्या सुमारास चामोर्शी-मूल मार्गालगतच्या वाघोली शिवारात रस्त्यापासून सुमारे शंभर मीटर अंतरावर उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.विशेष म्हणजे,रात्रीच्या सुमारास तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला होता. मृताची ओळख पटवणे पोलिसांपुढे मोठे आव्हान होते. अश्यातच चामोर्शी पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवली आणि आज,मंगळवार ८ सप्टेंबर रोजी मृतक तरुणाची ओळख पटली.बंटी उर्फ नंदकिशोर मोतीलाल मिश्रा वय ३४ वर्षे,रा.तेली मोहल्ला,वॉर्ड क्र.५,श्रीराम मंदिराजवळ,मूल,ता.मूल,जि.चंद्रपूर असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.दरम्यान,चामोर्शी पोलिसांनी हत्येचा तपास करण्यासाठी वेगवेगळी पथके तयार करून अज्ञात आरोपीचा शोध सुरू केला आहे.काही संशयितांची कसून चौकशी केली जात असून या प्रकरणाचा तपास चामोर्शी पोलीस ठाण्याचे ठाणेदार महादेव ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मोबाईल व्यसनातून मुक्तीचा जागर-विद्यार्थ्यांना प्रभावी मार्गदर्शन.. – नैनपूरच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळेत मार्गदर्शन वर्गाचे आयोजन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-मोबाईलचा वाढता वापर आणि त्यातून निर्माण होणारे व्यसन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या शारीरिक,मानसिक व सामाजिक विकासावर परिणाम करू शकते.या पार्श्वभूमीवर आज,मंगळवार ८...

लाईनमनला ‘एसीबी’चा जोरदार झटका..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका ३६ वर्षीय कंत्राटी लाईनमनला नागपूरच्या एसीबी पथकाने तब्बल ८ हजार ५०० रुपयांची लाच घेतांना रंगेहाथ पकडुन जोरदार झटका दिला आहे.मुकेश...

ट्रक आणि पिकअप वाहनाची समोरासमोर जोरदार धडक; सहा जणांचा जागीच मृत्यू,तर सात जण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-गोंदिया-बालाघाट राष्ट्रीय महामार्गावर एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे.गोंदिया-बालाघाट मार्गावरील नागरा परिसरात एका भरधाव ट्रक आणि पिकअप वाहनाची समोरासमोर जोरदार...

शासकीय शुल्काव्यतिरिक अतिरिक्त रकमेची मागणी; केवळ १५० रुपये घेतांना सेतू केंद्र चालकाला रंगेहाथ पकडले..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-नागरिकांना वेळेत व तात्काळ शासकीय प्रमाणपत्रे मिळावीत,यासाठी ऑनलाईन सेतू केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.मात्र,काही सेतू केंद्र चालक मनमानी कारभार करून शासकीय...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!