संपादक/सत्यवान रामटेके
उद्रेक न्युज वृत्त :- कित्तेक गावांमध्ये ग्रामीण पाणी पुरवठा योजना सुरू झाल्या व अनेक महिन्यांपासून सुरू आहेत.अशातच अनेक शासकीय कर्मचारी वा गावातील सर्वसामान्य नागरिक तसेच पुढाकारी यांना त्याबाबत माहिती नसल्याने शिकून अडाणी झाल्याचे दिसून येत आहेत.काहीजण ‘अतिशहाणा त्याचा बैल रिकामा’…असे करून आपलीच पोळी शेकण्याचा प्रयत्न करीत असूनही अनेकांना त्याची जाणीव नसल्याने याचे नवल वाटत आहे.अशातच प्रत्यक्ष निदर्शनास दिसून येत असूनही अनेकांच्या मुखातील वाचा बंद असून डब्ब्यात माल गीरवणाऱ्यांची बाजू घेतली जात असल्याने माहिती अधिकारात माहिती मागवून दणका देणे आवश्यक आहे.
ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता समिती :-
ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता समिती ही मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ कलम ४९ नुसार बनलेली प्रकल्पातील प्रमुख समिती आहे.प्रकल्पाची आखणी नियोजन अंमलबजावणी व देखभाल दुरुस्ती करण्याची जबाबदारी ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता समिती समितीची आहे.
समितीची रचना :
१) सदर समितीची निवड ग्रामसभेमधून केली जाईल २) सदर समितीचे अध्यक्ष सचिव यांची निवड ग्रामपंचायतीचे ग्रामसभेमधून केली जाईल.
३) या समितीमध्ये किमान १२ तर जास्तीत जास्त २४ सदस्य असतील
४) त्यातील किमान १/३ सदस्य हे ग्रामपंचायत सदस्या मधून निवडले जातील.
५) या समितीत ५० टक्के महिला सदस्यांचा समावेश असेल.
६) गावातील महिला मंडळ,युवा मंडळ, भजनी मंडळ महिला बचत गट वा सहकारी संस्था इ.चे प्रतिनिधीत्व असेल.
७) ग्रामस्तरीय शासकीय / जि.प./ग्रा.प./ कर्मचाऱ्यांची आमंत्रित व सहकारी सदस्य म्हणून निवड करण्यात येईल.पण त्यांना मतदानाचा अधिकार नसेल.
८) ३० टक्के मागासवर्गीय असतील ९) प्रत्येक वार्ड वा वस्ती मधून किमान एक प्रतिनिधी सदस्य म्हणून असेल.
सामाजिक लेखा परिक्षण समीती :-
दिनांक – २६ जानेवारी रोजी होणाऱ्या ग्रामसभेत सदर समिती गठीत करावयाची आहे.अपरिहार्य कारणास्तव दिनांक २६ जानेवारी रोजी ग्रामसभा झाली नाही तर पुढे नियामानुसार तातडीने पुढील ग्रामसभेत सामाजिक लेखा समिती गठीत करायची आहे.
समितीची रचना :-
१) सदर समितीमध्ये एकूण नऊ सदस्य असतील.
२) यापैकी १/३ महिला सदस्य असतील.
३) ग्रामीण पाणी पुरवठा समितीमध्ये अंतर्भूत नसाणाऱ्या किमान दोन सदस्यांची निवड या समितीवर करावी. निवड करावयाच्या ग्रामपंचायत सदस्याची शैक्षणिक अर्हता किमान एसएससी असावी. व त्यांना हिशोबाची व लेखापरिक्षणाची जाण असावी.
४) गावातील शैक्षणिक संस्थामधील शिक्षक / प्राध्यापक यामधून कमाल २ प्रतिनधीची नियुक्ती या समितीवर करावी.
५) गावातील सेवा निवृत्त अधिकारी/कर्मचारी ज्यांना हिशेबाचे व लेख परिक्षणाची जाण आहे अशा एका व्यक्तीची नियुक्ती समितीवर करावी
६) गावातील व अथवा परिसरातील सेवाभावी संस्थेतील एक प्रतिनिधीची नियुक्ती करावी.
७) गावातील युवा मंडळ, राष्ट्रीय साक्षरता अभियानामधील किमान पदवीधर प्रतिनिधी समितीवर घ्यावा.बी कॉम असणाऱ्यांना प्राधान्य द्यावे..
नळ पूरवठा योजनेचे लेखे :-
ग्रामीण पाणी पूरवठा व स्वच्छता समितीने पाणी पूरवठा योजनेच्या जमा खर्चाचे हिशोब ठेवण्याची जबाबदारी समितीमधील एक व्यक्तीवर सोपविण्याची आहे. या सदस्याने सर्व आर्थिक व्यवहाराचे लेखे अद्ययावत ठेवावयाचे आहेत. लेखे पुढील प्रमाणे १) पावती पुस्तक नमुना नंबर सात २) लोक वर्गणी जमेची नोंदवही ३) पाणी पट्टी वसूली नोंदवही (मागणी व वसूली) ४) कॅश बुक ५) खतावणी ६) साठा नोंदवही ७) मोजमाप पुस्तिका
वरील माहितीचे अवलोकन केल्यास अनेक ठिकाणी भोंगळ कारभार दिसून येतो.सदर अंमलबजावणी होणे आवश्यक आहे.मात्र तश्या प्रकारची अंमलबावणी होत नसल्याने आपले खिसे कसे गरम होणार; याकडे सर्वांचे लक्ष लागले असल्याने माहिती अधिकार कार्यकर्ते यांनी मिळून वाचा फोडणे गरजेचे आहे; असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.