- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-जिल्ह्याच्या सिरोंचा तालुक्यातील जाफ्राबाद ग्रामपंचायतीच्या सरपंच व चार सदस्यांना जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी विहित मुदतीत कराचा भरणा न केल्याने नुकतेच आदेश काढून अपात्र ठरविले आहे.
महत्वाचे म्हणजे,जाफ्राबादच्या सरपंचाकडे १ हजार ८ रुपयांचे गृहकर थकीत होते.याबाबतचे मागणी बिल
सरपंच तसेच सदस्यांना २५ मे २०२४ रोजी ग्रामपंचायत कार्यालयाकडून देण्यात आले होते.अशातच टेकडाताला येथील साईकुमार पुलय्या मंदा यांनी जाफ्राबादच्या सरपंच निर्मला बिचमय्या कुळमेथे,ग्रामपंचायत सदस्य बिचमय्या येर्रय्या कुळमेथे,रोशक्का नारायण जाडी,यशोदा किसमतराव मडावी,क्रिष्णवेणी शंकर आत्राम यांच्याविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करून सरपंच व अन्य चार सदस्यांनी गृहकर भरला नसल्याचा आरोप केला होता.मागणी बिलाची पावती प्राप्त झाल्यानंतर कराचा भरणा ३ महिन्यांच्या विहीत कालावधीत भरणे आवश्यक आहे.मात्र,कर न भरल्याने याप्रकरणी सखोल चौकशी करण्यात आली.त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी पाचही जणांना अपात्र ठरविले आहे.
- Advertisement -