Wednesday, September 9, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तगोर गरीबांना दिलासा देणारी योजना थांबवली..! सर्वसामान्यांच्या आनंदावर विरजण; तर गलेलठ्ठ पगारदारांना...

गोर गरीबांना दिलासा देणारी योजना थांबवली..! सर्वसामान्यांच्या आनंदावर विरजण; तर गलेलठ्ठ पगारदारांना आनंदोत्सव..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यात मोठ्या धुमधडाक्यात ‘आनंदाचा शिधा’ योजना २०२२ मध्ये सुरू करण्यात आली होती.आनंदाचा शिधा योजनेंतर्गत राज्यातील गोर गरिबांना सणासुदीच्या काळात केवळ शंभर रुपयांमध्ये चार वस्तू मिळत होत्या.यात एक किलो रवा,एक किलो चना डाळ,एक किलो साखर आणि एक लीटर पामतेल देण्यात येत होते.किटचे वितरण पहिल्यांदा २०२२ मध्ये दिवाळीला करण्यात आले होते. त्यानंतर गुढीपाडवा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, गणेशोत्सव आणि दिवाळी या सणांच्या निमित्ताने,तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सरकारने ‘आनंदाचा शिधा’ किटचे वितरण केले होते.अश्यातच शासनाने गोर गरीबांना दिलासा देणारी योजना थांबवली; तर गलेलठ्ठ पगारदारांना गणेशोत्सव निमित्ताने आनंदोत्सव साजरा करण्यास पाच दिवस अगोदरच पगार देण्याचे शासन निर्णय जारी केल्याने शासनाच्या भूमिकेबद्दल सर्वसामान्यांमध्ये तीव्र रोष व्यक्त करण्यात येत आहे.ज्या कालावधीत गोर गरिबांना शंभर रुपयांत किटचे वितरण केले जायचे,अश्या कालावधीत शासनाने सर्वसामान्य नागरिकांना ठेंगा दाखवल्याच्या प्रतिक्रिया जनसामान्यांतून उमटू लागल्या आहेत.लाडकी बहीण योजनेमुळे गोरगरिबांना सणासुदीच्या काळात ‘आनंदाचा शिधा’ मिळणार नसल्याचे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी यापूर्वी स्पष्ट केले होते.
लाडकी बहीण योजनेसाठी ४५ हजार कोटी रुपये लागतात,तर शिवभोजन थाळी साठी वर्षाला
१४० कोटी रुपये तर ‘आनंदचा शिधा’ यासाठी ५५० कोटी रुपये लागत होते.त्यामुळे राज्याच्या तिजोरीवरील वाढते ताण बघता निधी उपलब्ध होईल तशी योजना चालवत राहू,असे अन्न व नागरी पुरवठा मंत्री भुजबळ म्हणाले होते.त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात आनंदाचा शिधा मिळणार नाही,असेही त्यांनी स्पष्ट केले होते.मात्र,योजनेमुळे गोरगरीब लोकांना किमान खर्चात आवश्यक खाद्यपदार्थ मिळत होते.त्यामुळे सणासुदीचा आनंद अनेकांच्या घराघरांत पोहोचत होता.एकीकडे गोर गरीबांना दिलासा देणारी योजना थांबवली जाते,तर दुसरीकडे सरकारी कर्मचाऱ्यांना गणेशोत्सवाचे निमित्त साधून शासनाने पटकन पगार देऊ केल्याचे निर्णय घेतलेत.यामुळे असा विरोधाभास कां? असा सवाल उपस्थित केला जातो आहे.शासकीय कर्मचाऱ्यांचे आज ना उद्या पगार देणेच आहे; मात्र,गोर गरिबांच्या योजनेला कात्री लावणे कितपत योग्य आहे,असेही सुर सर्वसामान्य नागरिकांच्या मुखातून उमटू लागले आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पावसाची विश्रांती; पाण्याचे योग्य नियोजन करण्यासह तण,खत तसेच कीड-रोग व्यवस्थापनाकडे शेतकऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे- कृषी विभाग

उद्रेक न्युज वृत्त :-राज्याच्या विविध भागात ऑगस्ट व सप्टेंबरच्या सुरुवातीला झालेल्या पावसानंतर सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे.अशा परिस्थितीत धान पिकावर पाण्याचा ताण येऊ नये...

आज डोंगरगाव-हलबी येथे एकल महिला मेळावा संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत आज,बुधवार ९ सप्टेंबर रोजी देसाईगंज तालुक्याच्या गट ग्रामपंचायत डोंगरगाव-हलबी येथे परिसरातील चिखली रिट व अरततोंडी येथील...

देसाईगंज पोलिसांची मोठी कामगिरी; हरविलेले २५ मोबाईल मूळ मालकांना परत..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-एकदा कां मोबाईल हरवला, तर तो परत मिळण्याची शाश्वती कमीच असते.मात्र, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर व नागरिकांच्या तक्रारींना त्वरित प्रतिसाद देत देसाईगंज...

गणेशोत्सवात भक्तांच्या आरोग्याची काळजी; राज्यभर २० हजार मोफत आरोग्य तपासणी शिबिरे.. – सर्व ३६ जिल्ह्यांत उपक्रमाची व्याप्ती..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-श्रीगणेशोत्सवात भक्तांच्या आरोग्याची काळजी घेत मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या पुढाकाराने राज्यभर सुमारे २० हजार मोफत आरोग्य तपासणी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!