उद्रेक न्युज वृत्त
कुरखेडा(कढोली) :- गोठ्यात बांधलेल्या बोकड व शेळीवर बिबट्याने हल्ला करून त्यांची शिकार केल्याची घटना कुरखेडा तालुक्यातील कढोली येथे गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडल्याने पशुपालकाचे आर्थिक नुकसान झाले आहे.
मागील अनेक दिवसांपासून कढोली परिसरात बिबट्याची दहशत आहे.दरम्यान,गुरुवारला पहाटेच्या सुमारास बिबट्याने कढोली येथील मुर्लीधर चौधरी यांच्या गोठ्यात प्रवेश केला.गोठ्यातील बोकड व शेळीवर हल्ला करून ताव मारला.सकाळी शेळीमालक मुर्लीधर उठले असता,ही बाब निदर्शनास आली. याची माहिती वनविभागाला देण्यात आली. वनकर्मचा-यांनी पंचनामा केला.शेळीमालकास आर्थिक मदत द्यावी; अशी मागणी होत आहे.