उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- घरगुती इंधन गॅस दर वाढीच्या विरोधात गडचिरोली शिवसेना महिला आघाडीच्या वतीने केंद्रातील भाजप सरकारचा गांधी चौक गडचिरोली येथे शिवसेना महिला आघाडी संघटीका छायाताई कुंभारे यांच्या नेतृत्वात शेकडो महिलांच्या उपस्थितीत जाहीर निषेध करण्यात आला.
काही वर्षा पूर्वी केंद्रात काँग्रेस शासन असताना च्या काळात साडेतीनशे रुपये चे गॅस सिलेंडर मिळत होते परंतु केंद्रात भाजपा चे सरकार आल्या पासून महागाई सपाट्याने वाढण्यास सूरवात झाली खाण्याचे तेला चे भाव वाढले पेट्रोल डिझलचे चे भाव वाढले वाढत्या महागाई मुळे सर्व साधारण लोकांचे जगणे कठीण झाले आहे.महागाई मुळे भाजपने गरीब लोकांना सडो की पळो करून सोडले आहे.यातच घरगुती गॅस सिलेंडरच्या दत ५० रुपयांनी वाढ केली.सुरवातीला उज्वला गॅस गोर गरिबांना मोफत दिले व नंतर ५०० रू किंमतने गॅस दिले.
आता उज्वला योजनेतील नागरिकांनाही ११०० रुपये द्यावे लागतात.गॅसच्या भाववाढीमुळे अनेक महिलांनी गॅसवर स्वयंपाक करणे सोडून लाकूड जाळून स्वयंपाक करणे सुरू केले असल्याने केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.जाहीर निषेध प्रसंगी केंद्र शासन मुर्दाबादचे नारे लावण्यात आले.प्रसंगी छायाताई कुंभारे यांनी म्हटले की,केंद्रातील भाजप सरकारने नेहमी नेहमी महागाई वाढवून आम्हा महिलांचे जिने हराम केले आहे.कसबा,चीचवडची निवडणूक पाहून तसेच कोणतीही निवडणूक पाहून भाव कमी करायचे आणि निवडणूक नंतर दुपटीने भाववाढ करायचे हे भाजप सरकारचे धोरण आहे. येत्या काळात पुन्हा भाववाढ करण्यात आली तर शिवसेना महिला आघाडी याही पेक्षा तीव्र आंदोलन करेल.असे छायाताई कुंभारे यांनी म्हटले.
निषेध प्रसंगी जोत्सना राजूरकर,नूतन कुंभारे,देवकी कंकडालवार,आरती खोब्रागडे,रिंकू वासलवार,संध्या हेमके,रीहानी दीक्षित,माधुरी राजूरकर,सुलभा राजूरकर,रेखा कुमरे,यामिना आलाम,सपना मेश्राम, संगीता रामटेके,अपूर्वा कटकवार,शिरसागर ताई,वैशु ताई व शेकडो महिला शिवसैनिक उपस्थित होत्या.