Tuesday, August 11, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तगृहनिर्माण अभियंते आर्थिक अडचणीत; तर घरकुल लाभार्थी संकटात..

गृहनिर्माण अभियंते आर्थिक अडचणीत; तर घरकुल लाभार्थी संकटात..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-राज्य शासनाच्या ग्रामीण विकास यंत्रणांतर्गत घरकूल योजनेत कार्यरत ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांचे गत सहा महिन्यांपासून मानधन थकीत असल्याने अभियंत्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.वारंवार मागणी केल्यानंतरही मानधन मिळत नसल्याने  ग्रामीण गृहनिर्माण संघटनेने बुधवारपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे.यामुळे घरकुल लाभार्थ्यांचे  मिळणारे अनुदान थांबले आहे. विशेष म्हणजे,ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांच्या माध्यमातून घरकुल लाभार्थ्यांच्या कामांची फोटो काढणे,ती अपलोड करणे व पुढील हप्त्याची रक्कम वितरीत करणे व इतर कामे पार पाडली जातात. मात्र, कामबंद आंदोलनामुळे सर्व कामे ठप्प पडल्याने घरकुल लाभार्थीही संकटात सापडले आहेत.
ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांनी प्रधान सचिव एकनाथ डवले व जिल्हा प्रकल्प अधिकारी यांना पत्र देऊन मागील ६ महिन्यांचे थकीत मानधन देण्यात यावे,अशी मागणी केली होती.मात्र,अद्याप मानधन मिळण्याचे नावच घेत नाही.या अभियंत्यांनी गेल्या सात वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने अतिशय कमी मानधनावर ग्रामीण भागातील घरकूल योजनांसाठी परिश्रम केले आहेत,मात्र वारंवार मानधन विलंबामुळे आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
ग्रामविकास विभागामार्फत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व पंचायत समिती घरकूल विभागांतर्गत राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांमध्ये केंद्रपुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना(ग्रामीण)सोबतच राज्यपुरस्कृत रमाई आवास,शबरी आवास योजना, यशवंतराव चव्हाण आवास योजना व इतर योजना राबविल्या जात आहेत.अश्यातच मागील सहा महिन्यांपासून मानधन थांबल्याने आता अभियंत्यांच्या आंदोलनाला तीव्र रूप आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अचानक विजांचा लखलखाट; विज कोसळून महिलेचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील मऱ्हेगाव येथील राजुली जंगल परिसरात गुरे चारण्यासाठी गेलेल्या उत्तरा उत्तम थेर वय ४७ वर्षे या महिला गुराखीचा वीज कोसळून...

सर्पदंशग्रस्त चिमुकलीला नागपूरला हलविले..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंश झालेल्या कुमारी दीपिका बिलकुरासाय मडावी वय ११ वर्षे हिला पुढील उपचारासाठी जिल्हा प्रशासनाने...

दुःखद घटना..! तीन शालेय विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू; तर अन्य तीन विद्यार्थिनींवर उपचार सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे.या घटनेची प्रशासनाने गंभीर दखल...

आरमोरी येथे आरपीआयची बैठक संपन्न; विविध विषयांवर विचारमंथन..

उद्रेक न्युज वृत्त  आरमोरी(गडचिरोली):-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आरपीआय)च्या वतीने आरमोरी येथील विश्राम गृहात नुकतीच पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.या बैठकीत पक्ष संघटन मजबूत करण्यासह विविध सामाजिक,राजकीय...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!