- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-गडचिरोली तालुक्याच्या गोगाव येथे राहणाऱ्या ३५ वर्षीय विवाहित पुरुषाने एक महिन्यापूर्वी तालुक्यातील दिभना येथे गळफास घेऊन आत्महत्या केली होती.त्यानुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.अशातच आता तब्बल एका महिन्यानंतर प्रकरणाला नवे वळण आले असून गळफास घेण्यापूर्वी विवाहित पुरुषाने मोबाईलवर एक व्हिडिओ बनवला अन् पत्नीचे बिंग फुटले.त्यानुसार गळफास घेणाऱ्याच्या वडिलांनी मयताच्या पत्नीवर गडचिरोली पोलिस ठाण्यात गुन्हा गुन्हा दाखल केला.विवेक पुंडलिक भरडकर वय ३५ वर्षे, रा.गोगाव ता.गडचिरोली असे एका महिन्यापूर्वी आत्महत्या करणाऱ्या विवाहिताचे नाव आहे.
माहितीनुसार,विवेक हा गवंडीकाम करायचा.२०१३ मध्ये त्याचा विवाह निमगाव जि.चंद्रपूर येथील अल्का हिच्याशी झाला होता.लग्नानंतर काही दिवस सुखात गेले,नंतर पती पत्नीत कौटुंबिक कारणावरुन खटके उडू लागले.यातून काही दिवस ती माहेरी राहत होती. नातेवाईकांनी समजावल्यानंतर ती परत नांदण्यास आली.दरम्यान, १६ नोव्हेंबर २०२४ रोजी पती-पत्नीत वाद झाला.१७ नोव्हेंबरला रोजी तो बाम्हणी येथे बांधकामावर कामासाठी गेला.नंतर तो परतलाच नाही. २४ नोव्हेंबरला त्याचा मृतदेह दिभना येथे
आढळला.विवेकने १७ नोव्हेंबरला आपल्या मोबाइलमध्ये एक व्हिडिओ बनवला होता.त्यात त्याने पत्नी सतत चारित्र्यावर संशय घेते,तिच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत आहे; असे म्हटले होते.या व्हिडिओआधारे पुंडलिक भरडकर यांच्या फिर्यादीवरुन गडचिरोली ठाण्यात आत्महत्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलम १०८ अन्वये गुन्हा नोंद झाला.
- Advertisement -

