- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-विधानसभा निवडणूक कालावधीत महायुतीकडून शेतकरी कर्जमाफी संदर्भात वक्तव्य करण्यात आले होते.त्यानुसार शेतकरी बांधव कर्जमाफी होण्याच्या आशेवर होते.मात्र,आर्थिक वर्ष संपण्यासाठी एक दोन दिवस बाकी असतांनाच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एक ते दोन वर्ष शेतकरी कर्जमाफी होणार नसून शेतकऱ्यांनी आजच बँकेत कर्जाची परतफेड करून घ्यावी,असे एका कार्यक्रमात बोलतांना सांगितल्या गेले होते.त्यामुळे शेतकरी वर्ग हताश होऊन काही ठिकाणी शेतीच्या कर्जपायी आत्महत्या करू लागले होते.त्यातच कित्तेकांनी कर्जाची परतफेड केली. अशातच माजी राज्यमंत्री तथा प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीसह विविध १७ मागण्यांसाठी ८ जून २०२५ पासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते.त्यानुसार आंदोलनाची महायुती सरकारने दखल घेत बच्चू कडू यांना लेखी आश्वासन दिल्याने शनिवार १४ जून रोजी अन्नत्याग आंदोलन आणि चक्का जाम आंदोलन स्थगित करण्यात आला होता.त्यानुसार नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफी संदर्भात योग्यवेळी निर्णय घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते.त्यानंतर आता महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील शेतकरी कर्जमाफीबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.गरजू शेतकऱ्यांचेच कर्ज माफ केले जाईल,पण धनदांडग्या शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची सवलत मिळणार नाही.त्यासाठी उच्चस्तरीय समिती तयार होत आहे, अधिवेशन काळात ती समिती घोषित करू,शेतकरी कर्जमाफीबाबत मुख्यमंत्र्यासोबत कालच चर्चा झाली आहे,आमची समिती तयार होत आहे,अधिवेशन काळात ती घोषित करू.पावसाळी अधिवेशन ३० जून पासून १८ जुलै पर्यंत मुंबईत चालणार आहे.याच काळात येत्या ३ तारखेला ४ वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत बच्चू कडू यांच्यासोबत विधानभवनात बैठक आहे.माझ्या दालनात ही बैठका असणार आहे. या बैठकीत ८ ते १० मंत्री सोबत असतील,तेव्हा काही महत्त्वाच्या विषयाचे शासन निर्णय घेतले जातील. अमरावती जिल्ह्यातील कौडण्यापूर येथील विठ्ठल मंदिराच्या दर्शनासाठी गेल्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. बावनकुळे पुढे म्हणाले की,आपल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने लाडक्या बहिणींसाठी जो महिना १५०० रुपये सुरू केला होता, तो पुढच्या काळात लाडक्या बहिणींना २१०० रुपये देणार आहोत.आमच्या शेतकऱ्यांना आम्ही शब्द दिला होता की,त्यांना पुढील ५ वर्षे शेतात वीजेचे बिल येणार नाही.तसेच आमच्या सरकारने सांगितले की, खऱ्या गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफी आम्ही देणार आहोत.त्यांची कर्जमाफी आम्ही करणार आहोत,पण शेतीवर कर्ज काढून ज्यांनी मर्सिडीज घेतल्या,ज्यांचे लेआऊट आहेत,फॉर्म हाऊससाठी कर्ज घेतलेल्यांना कर्जमाफी मिळणार नाही. असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे येत्या काळात शेतकरी कर्जमाफी बाबत मोठी घोषणा होऊन कर्जाची परतफेड न करणाऱ्या लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
- Advertisement -

